Home हिंदी फुटाळा प्रकल्पाच्या निर्माण कार्याला गती; रस्ते निर्माण कार्य 90 टक्के पूर्ण

फुटाळा प्रकल्पाच्या निर्माण कार्याला गती; रस्ते निर्माण कार्य 90 टक्के पूर्ण

719

प्रेक्षक दीर्घा, संगीत कारंजे, शिल्पकलेचे नमुने होणार आकर्षणाचे केंद्र

नागपूर ब्यूरो : केंद्रीय रस्ते निधी अंतर्गत फुटाळा परिसरातील रस्ता पुनर्निर्माण कार्य महा मेट्रो तर्फे जलद गतीने सुरु असून रस्त्याच्या बहुतेक भागाचे बांधकाम कार्य पूर्ण झाले आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाद्वारे महा मेट्रो हा प्रकल्प राबवित असून केंद्रीय रस्ते निधी (सीआरएफ) अंतर्गत 112.89 कोटी चा खर्च या कार्यास अपेक्षित आहे.

या प्रकल्पांतर्गत सिमेंट रस्त्यांचे बांधकाम व पावसाळी नालीचे तसेच दर्शक दीर्घा (व्ह्युइन्ग गॅलरी) उभारण्याचे काम देखील या ठिकाणी सुरु आहे. या रस्त्याची एकूण लांबी 2.860 कि.मी असून रुंदी 18 मीटर व 24 मीटर आहे तसेच कॉन्क्रीट रस्त्याच्या दोन्ही बाजूने भूमिगत सेवा वाहिन्या या पेव्हर ब्लॉकने आच्छादित असतील. या ठिकाणी महा मेट्रोच्या वतीने आता पर्यंत सुमारे 90 % कार्य पूर्ण झाले असून उर्वरित जलद गतीने सुरु आहे.

ह्या संपूर्ण रस्त्यावर लाईटची व्यवस्था राहणार असून पावसाळी नाली रस्त्याच्या दोन्ही बाजूने असणार तसेच त्यावर फुटपाथची व्यवस्था करण्यात आली आहे. मुख्य म्हणजे दर्शक दिर्घेच्या निर्माण कार्याला महा मेट्रोने सुरुवात केली आहे. 350 मीटर लांब असलेल्या या दर्शक दिघेर्ची क्षमता सुमारे 4000 एवढी असेल. संगीत कारंजा शो करिता येणाºया दर्शकांना बसण्यासाठी प्रेक्षक दिर्घेचे काम प्रगती पथावर आहे.

या दर्शक दिर्घेला 6 प्रवेश राहणार असून तिकीट विक्री खिडकी व प्रसाधन गृहाची व्यवस्था देखील या ठिकाणी असणार आहे. प्रेक्षक दिर्घेच्या वर टेंसाईल रुफ (छत) राहणार ज्यामुळे गॅलरीला स्टेडीयमचे रूप येईल. या निर्माण कार्या बरोबर संगीत कारंज्याचे कंट्रोल टॉवर व प्रोजेक्टर रूमचे निर्माण कार्य देखील सुरु आहे. प्रेक्षक दिर्घेच्या आतील रोषणाई आकर्षक राहणार असून जमिनीवरील पेव्हर ब्लॉक मध्ये देखील विविध प्रकारचे डिझाईन बनविण्यात आले आहेत जे प्रकाश झोतात उठून दिसेल. या सोबतच बसण्याकरिता खुर्च्यांची व्यवस्था करण्यात येणार आहे तसेच लहान मुलांसाठी खेळणी, झुला व विविध कलाकृती (शिल्पकलेचे पुतळे) लागणार आहेत.

या प्रकल्पाच्या कार्याचा आढावा घेण्याकरता केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी या संबंधी एक बैठक बोलावली होती. बैठकीत या विषयाशी संबंधित सर्वच विषयांवर सविस्तर चर्चा करित निर्माण कार्याला प्राथमिकता देत प्रकल्पाचे कार्य गतीने सुरु ठेवण्याच्या सूचना गडकरी यांनी दिल्या. सदर बैठकीत महा मेट्रोने निर्माणाधीन कार्याचे सादरीकरण केले. त्यावर मंत्री महोदयांनी समाधान व्यक्त करत जलद गतीने कार्य पूर्ण करण्याचे निर्देश दिले.


वाचकांनो आपन “आत्मनिर्भर खबर डॉट कॉम” ला ट्वीटर, इंस्टाग्राम आणि फेसबुक पर फॉलो करत आहात ना? अजूनपर्यंत ज्वाइन केले नसेल तर आमच्या अपडेट्स साठी आत्ताच क्लिक करा (ट्वीटर- @aatmnirbharkha1), (इंस्टाग्राम- @aatmnirbharkhabar2020), (फेसबुक- @aatmnirbharkhabar2020).