Home हिंदी कोरोनामुळे मृत डॉ. प्रतीक्षा ला यशोमती ठाकूर ने संबोधले ‘शहीद’

कोरोनामुळे मृत डॉ. प्रतीक्षा ला यशोमती ठाकूर ने संबोधले ‘शहीद’

777

मुंबई ब्यूरो : एका बाजूला कोरोनाचे उपचार करताना डॉक्टर त्याच आजाराने मृत पावल्याची केंद्र सरकार अशा डॉक्टरांची आकडेवारी नसल्याचे सांगत आहे. अनेक दिवस कर्तव्य बजावत असताना मृत्युमुखी पावलेल्या डॉक्टरांना शहीद दर्जा देऊन त्यांचा सन्मान करा अशी मागणी डॉक्टरांची शिखर संस्था असेलेली इंडियन मेडिकल असोसिएशन (IMA) राज्य आणि केंद्र सरकारकडे करत आहे. अशाच वातावरणात अमरावती येथील जिल्हा सामान्य रुग्णलयातील डॉ. प्रतीक्षा वालदेकर यांचा कोरोनामुळे मृत्यू झाला, त्यानंतर राज्याच्या महिला आणि बालकल्याण मंत्री यशोमती ठाकूर यांनी सोशल मीडिया वर त्या डॉक्टरांना श्रद्धांजली वाहताना ‘शहीद’ असा उल्लेख केल्यामुळे वैद्यकीय वर्तुळातून ठाकूर यांच्या या भूमिकेबाबत कौतुक केले जात आहे.

32 वर्षाच्या डॉ. प्रतीक्षा मागील अनेक दिवस कोरोनाच्या रुग्णांना अमरावती येथील इरवीन हॉस्पिटल येथे उपचार देत होत्या. त्या सात महिन्याच्या गर्भवती असून सुद्धा कोरोना बाधित रुग्णांना उपचार करीत होत्या. एमबीबीएस आणि एमडीचे वैद्यकीय शिक्षण घेतलेल्या डॉ. प्रतीक्षा काही दिवसापूर्वी कोरोनाबाधित रुग्णांना उपचार करत असताना या आजारानेच संक्रमित झाल्या. तब्बेत बिघडल्यानंतर त्यांना पुढच्या उपचाराकरिता नागपूर येथील रुग्णालयात हलविण्यात आले. मात्र रविवारी त्यांचा मृत्यू झाला.

याप्रकरणी राज्याच्या महिला आणि बालकल्याण मंत्री यशोमती ठाकूर यांनी सांगितले कि, “आज आपले डॉक्टर योद्धा म्ह्णून काम करीत आहे. आपल्या जीवाची बाजी लावून ते काम करीत रुग्णांना उपचार देत आहे. खासगी आणि शासकीय या दोन्ही क्षेत्रातील डॉक्टर या कोरोना काळात त्यांच्या सेवा बजावत आहे, त्यांचे मनोबल वाढविणे आपल्या सगळ्याचे काम आहे. ”

कोरोनामुळे 382 डॉक्टरांचे निधन

कोरोनाबाधित रुग्णांवर उपचार करताना शेकडो डॉक्टरांचा यामध्ये मृत्यू झाला. आजतागायत संपूर्ण देशातून कर्तव्य बजावत असतांना 382 डॉक्टरांचे निधन हे कोरोनामुळे झाले असल्याची माहिती इंडियन मेडिकल असोसिएशनने केंद्र शासनाला दिली आहे. त्यांनी या सर्व डॉक्टरांना शहीदांचा दर्जा द्या, आणि त्यांना केंद्र सरकार ने जी योजना जाहीर केली आहे त्या विम्याचे संरक्षण त्यांना द्यावे अशी मागणी केली आहे.

चांगला पायंडा पाडला

इंडियन मेडिकल असोसिएशनचे राज्य प्रमुख डॉ. अविनाश भोंडवे सांगतात कि, “गेली अनेक दिवस आम्ही ही मागणी करत आहोत की जे डॉक्टर कर्तव्य बजावताना कोरोनाचा संसर्ग होऊन मृत पावले आहेत त्यांचा यथोचित सन्मान करावा आणि त्यांना शहीदांचा दर्जा द्यावा. प्रथम मी आमच्या संस्थतर्फे राज्याच्या महिला आणि बालकल्याण मंत्री यशोमती ठाकूर यांनी आमच्या मृत डॉक्टर सहकाऱ्यांचा श्रद्धांजली वाहताना ‘शहीद’ असा उल्लेख केल्यामुळे आम्ही सर्व डॉक्टर मंडळी त्यांचे आभारी होत आहोत. त्यांनी हा चांगला पायंडा पाडला.


रीडर्स आप आत्मनिर्भर खबर डॉट कॉम को ट्वीटर, इंस्टाग्राम और फेसबुक पर फॉलो कर रहे हैं ना? अबतक नहीं किया है तो अभी क्लिक करें (ट्वीटर- @aatmnirbharkha1), (इंस्टाग्राम- @aatmnirbharkhabar2020), (फेसबुक- @aatmnirbharkhabar2020और पाते रहिये हमारे अपडेट्स.

Previous articleस्टोर ऑन व्हील : Xiaomi ने भारत में लॉन्च किया चलता-फिरता रिटेल स्टोर
Next article“छोटा बच्चा जानके, नाच नचा देंगे”, 6 माह के बच्चे ने नदी में की वॉटर स्कीइंग
वाचकांनो आपन “आत्मनिर्भर खबर डॉट कॉम” ला ट्वीटर, इंस्टाग्राम आणि फेसबुक पर फॉलो करत आहात ना? अजूनपर्यंत ज्वाइन केले नसेल तर आमच्या अपडेट्स साठी आत्ताच क्लिक करा (ट्वीटर- @aatmnirbharkha1), (इंस्टाग्राम- @aatmnirbharkhabar2020), (यू ट्यूब-@aatmnirbhar khabar )(फेसबुक- @aatmnirbharkhabar2020).