Home Nagpur #Maha_Metro| महा मेट्रो तर्फे व्यावसायिक जागा भाडे तत्वावर देण्यासंबंधी उपक्रम

#Maha_Metro| महा मेट्रो तर्फे व्यावसायिक जागा भाडे तत्वावर देण्यासंबंधी उपक्रम

नागपूर ब्युरो : स्थानिक व्यापारी आणि व्यावसायिक क्षेत्रात काम करणाऱ्यांपर्यंत पोहोचण्याकरता महा मेट्रो नागपूर तर्फे एक कार्यक्रम राबवला जाणार आहे. या अंतर्गत 2-दिवसीय कार्यक्रमाचे नियोजन करण्यात आले असून, या माध्यमाने व्यापारी समुदायाला महा मेट्रोच्या विविध स्थानकांवरील व्यावसायिक जागांच्या संदर्भात उपलब्ध संभाव्यतेची माहिती दिली जाईल.

येत्या 9 आणि 10 मार्च, 2023 रोजी होणाऱ्या या उपक्रमात स्थानिक व्यापारी आणि व्यावसायिकांचा सहभाग असेल. या उपक्रमाचा एक भाग म्हणून, मेट्रो स्थानकांवर व्यवसायाकरिता उपलब्ध असलेल्या जागा संबंधी उद्योजकांना तपशीलवार सादरीकरण केले जाईल. आवश्यकते प्रमाणे नागपूर मेट्रोने भाडेतत्त्वावर ऑफर केलेल्या व्यावसायिक जागा दर्शविण्यासाठी वर नमूद केलेल्या दोन तारखांना एक्वा आणि ऑरेंज लाईन्सवरील मेट्रो स्थानकांवर भेट देण्यात येईल.

या कार्यक्रमात सहभागी होऊ इच्छिणाऱ्यांनी आपली नोंदणी करावी. नोंदणी प्रक्रिया ३ मार्च पासून सुरु होईल. त्यासाठी एक फॉर्म भरावा लागेल. हा फॉर्म मेट्रो स्थानकांवर उपलब्ध असेल किंवा महा मेट्रोच्या सोशल अकाउंटवर शेअर केलेल्या लिंकद्वारे डाउनलोड केला जाऊ शकतो. फॉर्म स्कॅन करून Whatsapp नंबर (7410004321) वर पाठवता येईल. व्यक्तीचे नाव, संपर्क क्रमांक, पत्ता आणि बिझनेस प्रोफाइल सारखी माहिती व्हॉट्सएप क्रमांकावर शेअर करता येते.

ज्यांना फॉर्म भरणे शक्य होत नसेल त्यांनी या पद्धतीने व्हॉट्सएप क्रमांकावर माहिती शेअर करावी. या माध्यमाने दिलेल्या माहितीच्या आधारे सदस्यांना या कार्यक्रमाकरिता निमंत्रित केले जाईल. महा मेट्रोच्या मालमत्ता विकास (PD) विभागाचे अधिकारी 2 दिवसांच्या या कार्यक्रमात व्यापारी बंधू-भगिनींना आवश्यक ती मदत करतील आणि संबंधित माहिती देखील देतील.

सुरवातीपासूनच महा मेट्रोने अनेक उपक्रमांद्वारे विविध स्तरांवर नॉन-फेअर बॉक्स महसुलाला प्रोत्साहन देण्यासाठी अनेक उपाययोजना केल्या आहेत. या निमित्ताने मेट्रो स्थानकांवरील मोठ्या आणि लहान जागा व्यापारी आणि व्यापाऱ्यांना त्यांच्या व्यवसायाचा विस्तार करण्याची मोठी संधी देतात.

महा मेट्रो नागपूर विविध स्थानकांवर एकूण 52,400 चौरस फूट आकाराच्या 108 लहान जागा व्यवसायाकरिता उपलब्ध करून देत आहे. या शिवाय, 1.63 लाख चौरस फूट आकाराच्या 40 मोठ्या जागा भाडेतत्त्वावर देण्याच्या प्रतीक्षेत आहेत. अशा प्रकारे एकत्रितपणे, 148 मोठ्या आणि लहान जागा भाडेतत्त्वावर दिल्या जाणार आहेत आणि या माध्यमाने एकूण 2,15,400 चौरस फूट जागा उपलब्ध आहे. या उपक्रमाचा लाभ घेण्यासाठी व्यापारी आणि व्यावसायिक समुदायाने पुढाकार घ्यावा असे आवाहन महा मेट्रोचे तर्फे करण्यात आले आहे.

Previous article#Maha_Metro| माझी मराठी ज्ञाना तुकाची रे बोली
Next article#आत्मनिर्भर । फॅशन डिझायनर शुभांगी यांनी केले 70 मुलींना आत्मनिर्भर
वाचकांनो आपन “आत्मनिर्भर खबर डॉट कॉम” ला ट्वीटर, इंस्टाग्राम आणि फेसबुक पर फॉलो करत आहात ना? अजूनपर्यंत ज्वाइन केले नसेल तर आमच्या अपडेट्स साठी आत्ताच क्लिक करा (ट्वीटर- @aatmnirbharkha1), (इंस्टाग्राम- @aatmnirbharkhabar2020), (यू ट्यूब-@aatmnirbhar khabar )(फेसबुक- @aatmnirbharkhabar2020).