Home Maharashtra #आत्मनिर्भर । फॅशन डिझायनर शुभांगी यांनी केले 70 मुलींना आत्मनिर्भर

#आत्मनिर्भर । फॅशन डिझायनर शुभांगी यांनी केले 70 मुलींना आत्मनिर्भर

तीन दिवसीय फॅशन डिझाईन प्रशिक्षण नोंदणी अर्ज👇 https://docs.google.com/forms/d/1sEgbHQx6wGJg2m7ex7Awr7C5crjxO0j3iEC90r7A710/edit
नागपूर ब्युरो : नागपूरला आपल्या कर्तृत्वाने नावलौकिक मिळवून देणाऱ्या फॅशन डिझायनर शुभांगी गोस्वामी यांनी फॅशन डिझायनिंगच्या क्षेत्रात केवळ उंची गाठली नाही, तर गरजू कुटुंबांना जोडून 70 हून अधिक मुलींना शिवणकाम, नक्षीकाम, ब्लॉक पेंटिंगचे प्रशिक्षण देखील उपलब्ध करून दिले. त्या तुलसी प्रेरणादायी बहुउद्देशीय सेवा संस्था, नागपूरच्या अध्यक्ष असून त्यांनी ही संस्था गरीब व होतकरू महिलांना आत्मनिर्भर बनविण्यासाठी स्थापन केली. गेली सहा ते सात वर्षे त्यांनी स्वतः सोबतच अनेकांना स्वावलंबी केले आहे. आत्मनिर्भर खबर डॉट कॉमशी त्यांची खास बातचीत.

होतकरू मुलीच माझी खरी प्रेरणा

गरीब आणि होतकरू मुलींनी आत्मनिर्भर व्हावं अशी माझी मनापासून इच्छा होती. या मुलींनी स्वतःच्या पायावर उभे राहून आपलं कर्तृत्व गाजवावं असं मला नेहमीच वाटायचं. मी स्वतः या क्षेत्रात प्रशिक्षण घेऊन काम करत असल्याने मला या क्षेत्रातच काहीतरी वेगळं करावं असं सुरुवातीपासूनच वाटायचं. या होतकरू मुलींना बघूनच मला हे कार्य करण्याची प्रेरणा मिळाली.

फॅशन डिझायनिंगमध्ये मास्टर्स

मी मागील सहा सात वर्षांपासून या क्षेत्रात कार्यरत आहे. मी स्वतः फॅशन डिझायनिंगमध्ये मास्टर्स केलं आहे. सोबतच मॅन्युफॅक्चरिंग फॅशन डिझायनिंगचा डिप्लोमासुद्धा केला आहे. आजवर मी माझ्या या संस्थेच्या माध्यमातून साठ ते सत्तर मुलींना प्रशिक्षण दिले आहे.

महिलांना एकत्रित करून सुरू करणार गारमेंट इंडस्ट्री
आत्मनिर्भर खबर डॉट कॉम शी बोलताना तुलसी प्रेरणादायी बहुउद्देशीय सेवा संस्था, नागपूरच्या अध्यक्ष आणि विख्यात फॅशन डिझायनर शुभांगी गोस्वामी.
आत्मनिर्भर खबर डॉट कॉम शी बोलताना शुभांगी गोस्वामी म्हणाल्या की येत्या काळात महिलांना एकत्रित करून त्या गारमेंट इंडस्ट्री उभारणार आहेत. ही इंडस्ट्री उभारण्यासाठी लागणारे भांडवल उभे करण्याकरिता शासकीय योजनांची मदत घेतली जाईल. सोबतच ज्या अनेक संस्थांच्या माध्यमातून महिला जोडलेले आहेत त्यांची मदत घेतली जाईल. या महिलांना आत्मनिर्भर करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न देखील केले जातील.

तीन दिवसीय विशेष प्रशिक्षण शिबिर

प्रख्यात फॅशन डिझायनर शुभांगी गोस्वामी यांनी येत्या ११ एप्रिलपासून सुरू होणाऱ्या त्यांच्या तीन दिवसीय प्रशिक्षण शिबिराबद्दल सुद्धा माहिती दिली. सदर शिबिराची पहिली बॅच 11 ते 13 एप्रिल, दुसरी बॅच 14 ते 16 एप्रिल आणि तिसरी बॅच 17 ते 19 एप्रिलपर्यंत चालेल. त्या म्हणाल्या महिलांच्या कला कौशल्याच्या बळावर जग जिंकून दाखविण्याकरिता आणि फॅशनच्या जगावर अधिराज्य निर्माण करण्याकरिता त्यांना आत्मनिर्भर बनविणे आवश्यक आहे याच निर्धाराने असे विशेष प्रशिक्षण शिबिर आयोजित केले जात आहेत. 11 एप्रिलपासून सुरू होणाऱ्या तीन दिवसीय प्रशिक्षण शिबिरात बोट नेक व प्रिन्सेस अशा दोन ब्लाउज डिझाइन्स प्रशिक्षण आणि प्रात्यक्षिके यांच्या माध्यमातून शिकविली जाणार आहेत. याशिवाय संजीवनी ट्रस्ट सॅनेटरी नॅपकिनच्या संचालक सारिका खडसे यांचे मासिकपाळी या विषयावर मार्गदर्शनसुद्धा महिलांना लाभणार आहे. या शिबिराचा लाभ 18 वर्षाच्या मुलींपासून तर 50 वर्षाच्या महिलांनादेखिल घेता येते.असे आवाहनही यावेळी शुभांगी यांनी केले. अधिक माहितीसाठी व आपले प्रशिक्षण आरक्षित करण्यासाठी 82750 39251 या क्रमांकावर संपर्क साधावा.

Previous article#Maha_Metro| महा मेट्रो तर्फे व्यावसायिक जागा भाडे तत्वावर देण्यासंबंधी उपक्रम
Next article#Maha_Metro l होली पर मेट्रो सेवा दोपहर 3 बजे से
वाचकांनो आपन “आत्मनिर्भर खबर डॉट कॉम” ला ट्वीटर, इंस्टाग्राम आणि फेसबुक पर फॉलो करत आहात ना? अजूनपर्यंत ज्वाइन केले नसेल तर आमच्या अपडेट्स साठी आत्ताच क्लिक करा (ट्वीटर- @aatmnirbharkha1), (इंस्टाग्राम- @aatmnirbharkhabar2020), (यू ट्यूब-@aatmnirbhar khabar )(फेसबुक- @aatmnirbharkhabar2020).