Home Nagpur #Maha_Metro| माझी मराठी ज्ञाना तुकाची रे बोली

#Maha_Metro| माझी मराठी ज्ञाना तुकाची रे बोली

महा मेट्रो आणि अभिव्यक्तीच्या कार्यक्रमात दुमदुमली मराठी

नागपूर ब्युरो : मराठी भाषा गौरव दिनाचे औचित्य साधून महा मेट्रो नागपूर आणि अभिव्यक्ती वैदर्भीय लेखिका संस्था, नागपूर यांच्या संयुक्त विद्यमाने ”माझी भरजरी मराठी” या शीर्षकाचा एक विशेष कार्यक्रम आज खापरी मेट्रो स्टेशन येथे आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमात अभिव्यक्ती संस्थेच्या सदस्य नाट्य, कथा, कविता व अभिवाचनाचे विविध सांस्कृतिक कार्यक्रम सादर करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्ष ख्यातनाम लेखिका डॉ. शुभा साठे होत्या तर विशेष अतिथी महा मेट्रोचे संचालक श्री. अनिल कोकाटे आणि कार्यकारी संचालक श्री. उदय बोरवणकर उपस्थित होते.

डॉ. शुभा साठे यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणांत उपस्थितांना संबोधित करत सांगितले कि,मराठी भाषा ही कुठल्याही बाबतीत कमी नाही, मराठीत जे भाव व्यक्त करता येतात ते इतर भाषेत नाही. मराठीत एकूण ५२ बोली भाषा आहे, प्रत्येकाची गोडी वेगळी भाव वेगळे आणि म्हणून मराठी ही भरजरी आहे, समृद्ध आहे. भाषा कुठलीही असो तरी ती संस्काराच्या संस्कृतीची आणि विकासाचा प्रभावी माध्यम आहे असे प्रतिपादन त्यांनी यावेळी केले.

उपस्थित साहित्यकांना संबोधित करतांना श्री. अनिल कोकाटे यांनी सांगितले कि, अभिव्यक्ती वैदर्भीय लेखिका संस्थाने आजच्या या कार्यक्राची शोभा वाढवली तसेच मराठी भाषा गौरव दिन हा आठवडा भर विविध प्रकारे साजरा करण्यात येत असून ही आपल्या सर्वान करता अभिमानाची बाब आहे. या ठिकाणी उपस्थित लेखिका व कवियत्री धुरंदर असून खऱ्या अर्थाने आपली मायबोली मराठीला जपण्याचे कार्य आपल्या द्वारे होत ही अभिनंदनीय आहे.

कविता म्हणजे भावनांची अभिव्यक्ती मनाचे विचार योग्य शब्दात मांडता येतात त्यांना बुद्धिजीवी म्हणतात. मन शब्द बुद्धी आणि भावना यांचा समन्वय करणारी माणसे समाजात चांगले बदल घडवू शकतात असे मत श्री. उदय बोरवणकर यांनी व्यक्त केले.

यावेळी ज्या सदस्यांनी आजवर मेट्रो स्थानके पहिली नाहीत आणि मेट्रोने प्रवास केला नाही त्या सर्वांना मेट्रोचे अधिकारी यांनी माहिती देऊन स्थानक दाखविण्यात आली. या आगळ्या वेगळ्या कार्यक्रमाचा लाभ घेण्यासाठी मोठ्या संख्येने नागरिक व मेट्रो प्रवासी उपस्थित होते.

या कार्यक्रमाला अभिव्यक्ती वैदर्भीय लेखिका संस्थेच्या वतीने हेमा नागपूरकर, उपाध्यक्ष,स्वाती सुरंगळीकर, कार्याध्यक्ष,नंदा पुराणिक, कार्यकारिणी सदस्य,सुषमा मुलमुले, कोषाध्यक्ष,अंजली पांडे, प्रसिद्धी प्रमुख,माधुरी अशिरगडे, सदस्य उपस्थित होते कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. सुनंदा जुलमे यांनी केले.

Previous article#Nagpur | विज्ञान प्रदर्शनी में मनपा शालाओं के 150 बच्चों ने पेश किए 25 प्रोजेक्ट्स
Next article#Maha_Metro| महा मेट्रो तर्फे व्यावसायिक जागा भाडे तत्वावर देण्यासंबंधी उपक्रम
वाचकांनो आपन “आत्मनिर्भर खबर डॉट कॉम” ला ट्वीटर, इंस्टाग्राम आणि फेसबुक पर फॉलो करत आहात ना? अजूनपर्यंत ज्वाइन केले नसेल तर आमच्या अपडेट्स साठी आत्ताच क्लिक करा (ट्वीटर- @aatmnirbharkha1), (इंस्टाग्राम- @aatmnirbharkhabar2020), (यू ट्यूब-@aatmnirbhar khabar )(फेसबुक- @aatmnirbharkhabar2020).