Home हिंदी गुड न्यूज : महाराष्ट्राच्या पोलीस दलात 12528 पदांसाठी होणार भरती

गुड न्यूज : महाराष्ट्राच्या पोलीस दलात 12528 पदांसाठी होणार भरती

732

मुंबई ब्यूरो : महाराष्ट्र राज्य शासनाने पोलीस दलात लवकरच पोलीस शिपाई संवर्गातील 12528 पदांसाठी भरती करण्याचा ऐतिहासिक निर्णय घेतला आहे. राज्य शासनाच्या या निर्णयाबद्दल खुद्द राज्याचे गृह मंत्री अनिल देशमुख यांनी ट्वीट करुन
माहिती दिली आहे.

गुह मंत्री अनिल देशमुख यांनी म्हटले आहे की, “पोलीस शिपाई संवर्गातील 12528 पदांसाठी होणारी ही भरती सर्व समाजाला न्याय देणारी असेल. लवकरच भरतीची प्रक्रिया सूरू होईल. सर्व परीक्षार्थींना तयारीसाठी शुभेच्छा!” राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत पोलीस भरती संदर्भात महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे. राज्यात साडे बारा हजार पदांसाठी पोलीस भरती होणार आहे. पहिल्यांदाच इतक्या मोठ्या प्रमाणात पोलीस भरती होणार आहे. पोलीस भरतीची प्रक्रिया लवकर सुरू करण्यात येईल, अशी माहिती गृहमंत्री अनिल देशमुख यांनी बैठकीनंतर दिली आहे.

भरतीत मराठा समाजाला न्याय देणार : गृहमंत्री
मराठा समाजाचे आरक्षण टिकवण्यासाठी राज्य सरकार प्रयत्न करत आहे. दरम्यान राज्यात पोलीस विभागातील 12 हजार 528 रिक्त जागा भरण्यात येणार आहे. पण, ही भरती करताना मराठा समाजासाठी 13% जागा बाजूला काढून ही बाब कायद्यानुसार तपासून मराठा समाजाला न्याय देणार असल्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी स्पष्ट केलं आहे. आमदार विनायक मेटे यांनी पोलीस मेगा भरतीत मराठा समाजाच्या 13% जागा रिक्त ठेवण्याची मागणी केली होती. या पार्श्वभूमीवर गृहमंत्र्यांनी भूमिका स्पष्ट केली आहे.

——————
ये भी पढ़ें-

पीएम मोदी का जन्मदिन आज : राष्ट्रपति कोविंद, राहुल गांधी सहित अनेकों ने की दीर्घायु की कामना
नागपुर में अब अगले चार शनिवार, रविवार जनता कर्फ्यू
नागपुर के सीताबर्डी में अतिक्रमण पर चली जेसीबी, हुआ सफाया

Previous articleभारतीय सैनिकों का ध्यान भटकाने के लिए पंजाबी गाने बजा रहा चीन
Next articleट्विटर पर टॉप ट्रेंडिंग में चल रहा है ‘राष्ट्रीय बेरोजगारी दिवस’
वाचकांनो आपन “आत्मनिर्भर खबर डॉट कॉम” ला ट्वीटर, इंस्टाग्राम आणि फेसबुक पर फॉलो करत आहात ना? अजूनपर्यंत ज्वाइन केले नसेल तर आमच्या अपडेट्स साठी आत्ताच क्लिक करा (ट्वीटर- @aatmnirbharkha1), (इंस्टाग्राम- @aatmnirbharkhabar2020), (यू ट्यूब-@aatmnirbhar khabar )(फेसबुक- @aatmnirbharkhabar2020).