नागपुर ब्यूरो: आज गुढीपाडवा.. चैत्र महिन्याची सुरूवात… हिंदू धर्मानुसार, नव्या वर्षाची खरी सुरूवात तर गुढीपाडवा सणापासून होते. ज्या सणाची सर्वजण आतुरतेने वाट पाहत होते, तो सण अखेर आला आहे. धार्मिक मान्यतेनुसार, ज्याला साडेतीन मुहूर्तापैकी एक मुहूर्त मानला जातो. हिंदू दिनदर्शिकेनुसार आज 19 मार्चला गुढीपाडवा साजरा करण्यात येत आहे. ज्योतिषशास्त्र आणि हिंदू धर्मानुसार, गुढीला कोणत्या रंगाच्या साड्या नेसवाव्यात? कोणत्या रंगाची नाही? जाणून घ्या…

गुढीला कोणत्या रंगाच्या साड्या नेसवाव्यात? कोणत्या रंगाची नाही?
वैदिक पंचांगानुसार, आज चैत्र शुक्ल प्रतिपदेच्या शुभ मुहूर्तावर गुढीपाडवा सण साजरा करण्यात येत आहे. धार्मिक मान्यतेनुसार, गुढीपाडव्याच्या दिवशी विजयाचे प्रतिक म्हणून घराच्या अंगणात गुढी उभारली जाते. त्यानुसार, यंदा गुढीला कोणत्या रंगाची साडी नेसवू नये? किंवा कोणत्या रंगाची नेसवावी? अशा प्रकारचे प्रश्न तुमच्या मनात असतील, तर ज्योतिषाचार्य डॉ. भूषण ज्योतिर्विद यांनी याबाबत महत्त्वाची माहिती दिली आहे. जाणून घ्या…
चैत्र प्रतिपदा तिथी
चैत्र प्रतिपदा तिथी प्रारंभ 19 मार्च – गुरुवार सकाळी 6 वाजून 55 मिनिटांनीचैत्र प्रतिपदा तिथी समाप्ती 20 मार्च – शुक्रवार सकाळी 4 वाजून 50 मिनिटांनीउदय तिथीनुसार गुडीपाडवा 19 मार्च गुरुवार रोजी साजरा करण्यात येईल.
Nagpur | मृगनयनी हस्तशिल्प व हाथकरघा प्रदर्शनी को जबरदस्त प्रतिसाद
गुढीपाडवा शुभ मुहूर्त
19 मार्च गुरुवार – सुर्योदय – सकाळी 6 वाजून 26 मिनिटांनी19 मार्च गुरुवार – अभिजित मुहूर्त – दुपारी 12 वाजून 4 मिनिटांपासून ते दुपारी 12 वाजून 53 मिनिटांपर्यंत
गुढीच्या साडीचा रंग कोणता आणि कसा असावा?
ज्योतिषाचार्य डॉ. भूषण ज्योतिर्विद सांगतात, गुढीसाठी साधारणपणे प्रसन्न रंगांची निवड केली जाते. खालील रंग गुढीसाठी अधिक शुभ मानले जातात.
गडद पिवळा किंवा केशरी – हे रंग मांगल्याचे आणि चैतन्याचे प्रतीक मानले जातात. तुम्ही गुढीला या रंगाची साडी नेसवू शकता.
लाल – विजय आणि शक्तीचे प्रतीक म्हणून लाल रंगाची साडी वापरली जाते.
हिरवा – निसर्ग आणि समृद्धीचे प्रतीक म्हणून अनेक घरांमध्ये हिरव्या रंगाची साडी (विशेषतः काठपदराची) नेसवली जाते.
साडीचा प्रकार – शक्यतो जरीचा काठ असलेली रेशमी साडी किंवा ‘खण’ वापरावा. यामुळे गुढीला एक पारंपरिक आणि भव्य रूप येते. गुढी अधिक सुंदर दिसते.
गुढीला ‘या’ रंगाची साडी चुकूनही नेसवू नका..
धार्मिक मान्यतेनुसार, गुढीला कधीही एका विशेष रंगाची साडी नेसवत नाहीत. आणि तो रंग आहे काळा.. कारण काळा रंग मंगलकार्यात अशुभ मानला जातो. मग गुढीला कोणत्या रंगाची साडी नेसवावी?
वर दिलेल्या शुभ रंगांपैकी कोणतीही साडी..
शास्त्रानुसार कोणत्याही विशिष्ट एकाच रंगाचा आग्रह धरण्यापेक्षा, वर दिलेल्या शुभ रंगांपैकी जी तुमच्याकडे उपलब्ध असेल किंवा जी तुम्हाला आवडेल ती साडी तुम्ही वापरू शकता.




















