Home मराठी #Maha_metro | “इंफ्रास्ट्रक्चर क्षेत्रामध्ये मोठ्या प्रमाणावर रोजगाराच्या संधी उपलब्ध” – डॉ. बिजेश...

#Maha_metro | “इंफ्रास्ट्रक्चर क्षेत्रामध्ये मोठ्या प्रमाणावर रोजगाराच्या संधी उपलब्ध” – डॉ. बिजेश दीक्षित

371
नागपूर : नॅशनल इन्स्टिटयूट ऑफ कंस्ट्रक्शन मॅनेजमेंट (NICMRA), पुणे यांच्या पदवी प्रदान समारंभा मध्ये मुख्य अतिथी म्हणून डॉ. ब्रिजेश दीक्षित यांनी शुक्रवार, ११ नोव्हेंबर रोजी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. नॅशनल इन्स्टिटयूट ऑफ कंस्ट्रक्शन मॅनेजमेंट ही संस्था कंस्ट्रक्शन मॅनेजमेंट या विषयी पदव्यूत्तर कोर्सेस चालवते.

मेट्रो प्रकल्प हा पुण्यातील एक अत्यंत महत्वाकांक्षी प्रकल्प असून कंस्ट्रक्शन मॅनेजमेंटच्या विद्यार्थ्यांनी साईट विझीट आणि इंटर्नशिपच्या माध्यमातून मोठ्या प्रकल्पातील तांत्रिक बाबींची माहिती घेतलीआहे. पुणे मेट्रोच्या बांधकामाची तांत्रिक माहिती साईट व्हिझिटद्वारे आत्तापर्यंत १२०० इंजिनिअरिंग कॉलेजच्या विद्यार्थ्यांनी घेतली आहे. तसेच ३०० च्यावर इंजिनिअरिंग कॉलेजच्या विद्यार्थ्यांनी पुणे मेट्रोमध्ये इंटर्नशिप ट्रेनींग घेतले आहे.

शुक्रवारी नॅशनल इन्स्टिटयूट ऑफ कंस्ट्रक्शन मॅनेजमेंट येथील पदवी प्रदान सोहळ्यांला डॉ. ब्रिजेश दीक्षित हे प्रमुख पाहुणे, तर अजित गुलाबचंद, मुख्य ट्रस्टी, NICMAR आणि अनिल कश्यप, डायरेक्टर जनरल, NICMAR हे या प्रसंगी उपस्थित होते. या प्रसंगी डॉ. ब्रिजेश दीक्षित यांनी विद्यार्थ्यांना मार्गर्दर्शन केले.

डॉ.दीक्षित म्हणाले की,”भारतातील इंफ्रास्ट्रक्चर प्रकल्पांची अंमलबजावणी करताना प्रोजेक्ट मॅनेजमेंटचा योग्य तो उपयोग न केल्यामुळे प्रकल्प योग्य वेळेत आणि नियोजित किमतीमध्ये पूर्ण करणे शक्य होत नाही. प्रोजेक्ट मॅनेजमेंट/ कंस्ट्रक्शन मॅनेजमेंट मध्ये मोठ्या प्रमाणावर डिजिटायझेशन आणि आयटी चा वापर अनिवार्य झाला आहे. आयटी तंत्रज्ञानाचा वापर करूनच संपूर्ण प्रोजेक्टचे डिजिटल थ्रीडी मॉडेल बनवण्यात येऊन प्रकल्पाचे मॉनिटरिंग अत्यंत्य प्रभावीपणे राबवणे शक्य झाले आहे. पुणे आणि नागपूर प्रकल्प राबवताना फाइव्ह डी BIM (Five Dimensional Building Information Modeling) या तंत्रज्ञानाचा वापर केल्यामुळे प्रकल्प प्रभावीपणे राबवणे शक्य झाले आहे.

इंफ्रास्ट्रक्चर प्रोजेक्टची अंमलबजावणी करताना त्यामध्ये बहूशाखीय, विविध इंजिनिअरिंग शाखांच्या ज्ञानाची गरज पडते. त्यामुळे टीम वर्क शिवाय अश्या कामांची प्रभावीपणे अंमलबजावणी करता येत नाही.” डॉ. दीक्षित पुढे म्हणाले की, “भारताचा विकास अत्यंत्य वेगाने सुरुअसून येत्या काही वर्षात भारत ५ ट्रिलियन अर्थव्यवस्थेचा देश बनणार आहे आणि जागतिक अर्थव्यवस्थेच्या क्रमवारीने तिसरा देश बनेल. हा विकास दर गाठण्यासाठी इंफ्रास्ट्रक्चर क्षेत्रामध्ये मोठ्या प्रमाणावर गुंतवणूक सुरु असून कंस्ट्रक्शन मॅनेजमेंट, प्रोजेक्ट मॅनेजमेंट या क्षेत्रात मोठ्या प्रमाणात रोजगाराच्या संधी उपलब्ध होणार आहेत. आज NICMAR मधून पदवी घेतलेलया विद्यार्थ्यांना मोठ्या प्रमाणात काम करण्याची संधी उपलब्ध होणार आहे आणि या बदलत्या भारतामध्ये त्यांना योगदान करण्याची संधी उपलब्ध होणार आहे.”
Previous article#Pune | एमआईटी वर्ल्ड पीस यूनिवर्सिटी, पुणे द्वारा देश में पहली बार कॉन्शियसनेस – ‘द अल्टीमेट रियलिटी’ पर दो दिवसीय वैश्विक सम्मेलन
Next article#Khasdar_Mahotsav | 2 दिसंबर से खासदार सांस्कृतिक महोत्सव का होगा नागपुर में आगाज
वाचकांनो आपन “आत्मनिर्भर खबर डॉट कॉम” ला ट्वीटर, इंस्टाग्राम आणि फेसबुक पर फॉलो करत आहात ना? अजूनपर्यंत ज्वाइन केले नसेल तर आमच्या अपडेट्स साठी आत्ताच क्लिक करा (ट्वीटर- @aatmnirbharkha1), (इंस्टाग्राम- @aatmnirbharkhabar2020), (यू ट्यूब-@aatmnirbhar khabar )(फेसबुक- @aatmnirbharkhabar2020).