Home Nagpur #Nagpur | तुमच्या शहराबद्दल तुम्हाला काय वाटते ? केंद्र शासनाच्या सर्वेक्षणात आपले मत...

#Nagpur | तुमच्या शहराबद्दल तुम्हाला काय वाटते ? केंद्र शासनाच्या सर्वेक्षणात आपले मत नोंदवा

474

नागपूर ब्युरो : शहरातील नागरिकांना राहण्यासाठी आपले नागपूर किती सुलभ आहे, यासंबंधी सर्वेक्षण सुरु करण्यात आले आहे. केंद्र शासनाच्या अर्बन आऊटकम फ्रेमवर्क (Urban Outcome Framework) २०२२ अंतर्गत Ease of Living-2022 (जीवन सुलभता निर्देशांक (EoLI) हा उपक्रम राबविण्यात येत आहे. या सर्वेक्षणांतर्गत नागरिकांना काही प्रश्नांचे ऑनलाईन पद्धतीने उत्तर द्यायचे आहेत आणि त्यांना त्याचे ऑनलाईन प्रमाणपत्र सुद्धा दिले जाणार आहे.

आपल्या शहरात सार्वजनिक वाहतूक किती परवडणारी आहे, शहरातील पाणी पुरवठा कसा आहे, आरोग्य सेवा किती परवडणारी आहे, असे काही प्रश्न या सर्वेक्षणात विचारण्यात येणार आहे. आपल्या शहराची स्वच्छता, मनोरंजक सुविधा, शिक्षण, रोजगार, वायू प्रदूषण या सारख्या महत्वाच्या विषयांवर अगदी सरळ आणि सोपे प्रश्न विचारण्यात येणार आहेत. नागरिकांचे जीवनमान सुलभ करण्यासाठी सर्वेक्षण केले जात असून याचा लाभ भविष्यात सुविधा पुरविण्यासाठी होणार आहे. यासाठी एक लिंक (http://eol2022.org/CitizenFeedback%2c) उपलब्ध करण्यात आली आहे. या लिंकवर क्लिक करून प्रश्नाचे उत्तर द्यायचे आहेत.

मनपा आयुक्त तथा प्रशासक श्री. राधाकृष्णन बी. यांनी सांगितले की, भारत सरकार द्वारे जीवन सुलभता निर्देशांक (EoLI) चे उद्दिष्ट जीवनाच्या गुणवत्तेचे आणि शहरी विकासासाठी विविध उपक्रमांच्या प्रभावाचे मूल्यांकन करणे आहे. या सर्वेक्षणा अंतर्गत नागपूर शहरातील पायाभूत सुविधांचे आणि राहणीमानाबाबत आकलन विविध प्रश्नावलीद्वारा करण्यात येणार आहे. तरी, सर्व नागपूरवासीयांनी जास्तीत जास्त संख्येने या सर्वेक्षणाचा भाग होऊन शहरातील सुख सुविधांबद्दल आपले मत नोंदवावे.

नागपूर स्मार्ट सिटीचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. चिन्मय गोतमारे यांनीसुध्दा नागरिकांना आपले मत नोंदविण्याचे आग्रह केले आहे. याबाबत सविस्तर माहिती करिता नागपूर स्मार्ट सिटीच्या नागपूर महानगरपालिका, सिव्हिल लाईन्स येथील कार्यालयात संपर्क करा, असेही आवाहन त्यांनी केले.

Previous articleबल्लारशहा रेल्वेस्थानकातील पादचारी पुलाचा भाग तुटला:13 प्रवासी कोसळले; महिला ठार
Next article#Nagpur | ग्रामपंचायत निवडणूक क्षेत्रातील 17, 18 आणि 20 डिसेंबरला दारुची दुकाने बंद
वाचकांनो आपन “आत्मनिर्भर खबर डॉट कॉम” ला ट्वीटर, इंस्टाग्राम आणि फेसबुक पर फॉलो करत आहात ना? अजूनपर्यंत ज्वाइन केले नसेल तर आमच्या अपडेट्स साठी आत्ताच क्लिक करा (ट्वीटर- @aatmnirbharkha1), (इंस्टाग्राम- @aatmnirbharkhabar2020), (यू ट्यूब-@aatmnirbhar khabar )(फेसबुक- @aatmnirbharkhabar2020).