Home Nagpur #Nagpur | ग्रामपंचायत निवडणूक क्षेत्रातील 17, 18 आणि 20 डिसेंबरला दारुची दुकाने...

#Nagpur | ग्रामपंचायत निवडणूक क्षेत्रातील 17, 18 आणि 20 डिसेंबरला दारुची दुकाने बंद

530

नागपूर ब्युरो : जिल्ह्यातील 237 ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी मतदानाचा पूर्व दिवस (17 डिसेंबर) मतदानाचा दिवस (18 डिसेंबर) आणि मतमोजणी (20 डिसेंबर) रोजी तालुकास्तरावर होणार आहे. यादरम्यान ग्रामपंचायत निवडणूक क्षेत्रातील दारू विक्री बंद असणार आहे.

जिल्ह्यातील भिवापूर तालुक्यातील 10, कळमेश्वर 23, कामठी 27, काटोल 27, कुही 4,मौदा 25, नागपूर (ग्रामीण) 19, नरखेड 22, पारशिवनी 22, रामटेक 8, सावनेर 36, उमरेड 7, हिंगणा 7 ग्रामपंचायतींसाठी निवडणुका होणार आहेत. मतदानापूर्वीचा एक दिवस (17 डिसेंबर), मतदानाचा दिवस 18 डिसेंबर रोजी संपूर्ण दिवस प्रत्यक्ष मतदान होत असलेल्या ग्रामपंचायत क्षेत्रातील सर्व मद्य विक्री बंद राहील, तर मतमोजणीच्या दिवशी 20 डिसेंबर रोजी मतमोजणीचा अंतिम निर्णय घोषित होईपर्यंत मद्य विक्री बंद राहणार आहे. या आदेशाचा भंग करणाऱ्या अज्ञुनप्ती धारकाविरुद्ध नियमानुसार सक्तीची कार्यवाही करण्यात येणार असल्याचे आदेशात नमूद करण्यात आले आहे.

मतदार यादीविषयी आक्षेप असल्यास उपस्थित राहण्याचे आवाहन

भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार विभागीय आयुक्त विजयालक्ष्मी प्रसन्ना बिदरी यांना मतदार यादी निरीक्षक म्हणून नियुक्त करण्यात आले आहे. त्यानुषंगाने विशेष संक्षिप्त पुनरिक्षण कार्यक्रमाच्या दावे व हरकतीविषयी 30 नोव्हेंबर रोजी सायंकाळी 4.30 वाजता जिल्हाधिकारी कार्यालयातील छत्रपती सभागृहात बैठक आयोजित केली आहे. बैठकीला सर्व मतदार, नागरिक, राजकीय पक्ष यांनी लोकसभा किंवा विधानसभा निवडणुकीशी संबंधित मतदार यादीविषयी काही आक्षेप, तक्रार असल्यास बैठकीमध्ये उपस्थित रहावे, असे आवाहन जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी यांनी केले आहे.

Previous article#Nagpur | तुमच्या शहराबद्दल तुम्हाला काय वाटते ? केंद्र शासनाच्या सर्वेक्षणात आपले मत नोंदवा
Next article#Nagpur । आशीनगर झोनमधील 8 थकीत मालमत्ता करधारकांवर कारवाई
वाचकांनो आपन “आत्मनिर्भर खबर डॉट कॉम” ला ट्वीटर, इंस्टाग्राम आणि फेसबुक पर फॉलो करत आहात ना? अजूनपर्यंत ज्वाइन केले नसेल तर आमच्या अपडेट्स साठी आत्ताच क्लिक करा (ट्वीटर- @aatmnirbharkha1), (इंस्टाग्राम- @aatmnirbharkhabar2020), (यू ट्यूब-@aatmnirbhar khabar )(फेसबुक- @aatmnirbharkhabar2020).