Home Maharashtra बल्लारशहा रेल्वेस्थानकातील पादचारी पुलाचा भाग तुटला:13 प्रवासी कोसळले; महिला ठार

बल्लारशहा रेल्वेस्थानकातील पादचारी पुलाचा भाग तुटला:13 प्रवासी कोसळले; महिला ठार

359

चंद्रपूर जिल्ह्यातील बल्लारशहा रेल्वेस्थानकातील पादचारी पुलाचा प्री कास्ट स्लॅबचा भाग तुटल्याने १३ प्रवासी रेल्वे रुळांवर काेसळले. या दुर्घटनेत शिक्षिका असलेल्या ४८ वर्षीय नीलिमा रंगारी यांचा मृत्यू झाला, तर इतर १२ जणांवर उपचार सुरू आहेत. ही दुर्घटना रविवारी सायंकाळी ५.१५ वाजता घडल्याची माहिती रेल्वेचे जनसंपर्क अधिकारी अमोल गहुकर यांनी दिली.

अपघातातील गंभीर जखमींसाठी १ लाख व किरकोळ जखमींसाठी ५० हजार मदत रेल्वेने जाहीर केली आहे. हा पादचारी पूल ६० फूट उंच असून त्याची ४० वर्षांपूर्वी उभारणी करण्यात आली होती. रेल्वेने जारी केलेल्या निवेदनात केवळ ४ जण जखमी झाल्याचे नमूद केले आहे. तथापि, १३ प्रवासी ब्रिजवरून खाली पडले असून ४ जण जखमी झाले. जखमींपैकी एका महिलेचा मृत्यू झाला, तर दोघांची प्रकृती गंभीर आहे.

Previous articleउद्धव ठाकरेंची टीका | महाराष्ट्रावरील खरे संकट शिंदे व त्यांचा मिंधे गट हेच
Next article#Nagpur | तुमच्या शहराबद्दल तुम्हाला काय वाटते ? केंद्र शासनाच्या सर्वेक्षणात आपले मत नोंदवा
वाचकांनो आपन “आत्मनिर्भर खबर डॉट कॉम” ला ट्वीटर, इंस्टाग्राम आणि फेसबुक पर फॉलो करत आहात ना? अजूनपर्यंत ज्वाइन केले नसेल तर आमच्या अपडेट्स साठी आत्ताच क्लिक करा (ट्वीटर- @aatmnirbharkha1), (इंस्टाग्राम- @aatmnirbharkhabar2020), (यू ट्यूब-@aatmnirbhar khabar )(फेसबुक- @aatmnirbharkhabar2020).