Home हिंदी कोरोना संसर्ग : ऑक्सीजन पुरवठा नियंत्रणासाठी जिल्हास्तरीय समिती स्थापन

कोरोना संसर्ग : ऑक्सीजन पुरवठा नियंत्रणासाठी जिल्हास्तरीय समिती स्थापन

नागपूर : जिल्ह्यातील शासकीय व खासगी रुग्णालयामध्ये कोरोना संक्रमण काळात ऑक्सीजनचा तुटवडा पडणार नाही. यासाठी राज्य शासनाच्या निर्देशाप्रमाणे कोरोना संक्रमण काळातील ऑक्सीजन पुरवठा नियंत्रणासाठी जिल्हास्तरीय समिती स्थापन करण्यात आली आहे.

जिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे अध्यक्ष रवींद्र ठाकरे यांनी यासंदभार्तील निर्देश आज जारी केले आहे. निवासी उपजिल्हाधिकारी नागपूर यांच्या अध्यक्षतेखाली ही समिती कार्यरत असेल. यामध्ये जिल्हा उद्योग केंद्राचे महाव्यवस्थापक, उपप्रादेशिक कार्यालयाचे परिवहन अधिकारी, अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक सदस्य आहेत. तर सदस्य सचिव म्हणून अन्न व औषध प्रशासन नागपूर या विभागाचे सहाय्यक आयुक्त आहेत. कोणत्याही जिल्ह्यामध्ये आॅक्सिजनचा तुटवडा जाणवणार नाही, यासाठी सार्वजनिक आरोग्य विभागाच्या प्रधान सचिवांनी जिल्हास्तरावर ही समिती गठीत करण्याचे निदेर्शीत केले आहे.

समिती ठेवणार समन्वय 

जिल्ह्यातील सर्व रुग्णालये, ऑक्सीजनचा पुरवठा करणारे उत्पादक, ऑक्सीजन निर्मिती होत असलेले सर्व कारखाने, ऑक्सीजनचे मोठे पुरवठादार या सर्वांशी ही समिती समन्वय ठेवणार आहे. या समितीमार्फत जिल्ह्यात ऑक्सीजनची कमतरता, पुरवठा व सनियंत्रणाची कार्य पार पाडली जाणार आहे. यासंदर्भात कुठलीही अडचण असल्यास आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण अंतर्गत स्थापन करण्यात आलेल्या नियंत्रण कक्षाला संपर्क साधता येणार आहे. ऑक्सीजन संदभार्तील अडचणीसाठी 0712-2562668 या क्रमांकावर संपर्क साधता येणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here