Home Builders & Developers #Nagpur | क्रेडाई एक्स्पो’मुळे अनेकांचे गृहस्वप्न साकार, गुंतवणूकदारांकडूनही उदंड प्रतिसाद

#Nagpur | क्रेडाई एक्स्पो’मुळे अनेकांचे गृहस्वप्न साकार, गुंतवणूकदारांकडूनही उदंड प्रतिसाद

366

नागपूर ब्यूरो: क्रेडाई नागपूर मेट्रोच्यावतीने नुकतेच मध्यभारतातील प्रॉपर्टी खरेदी आणि गुंतवणूकीसाठी विश्वासाचे स्थान असलेल्या क्रेडाई प्रॉपर्टी एक्स्पोचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये नागपूरच नव्हे तर विदर्भातील ग्राहकांचाही चांगला प्रतिसाद मिळाला. या एक्स्पोमुळे अनेकांचे गृहस्वप्न साकार झाले तर अनेकांची भविष्यातील सुरक्षित गुंतवणूकीची समस्या सुटली.

चार दिवसीय प्रॉपर्टी एक्स्पोमध्ये विदर्भातील प्रतिष्ठित आणि पिढ्यांपासून गृहनिर्माण आणि विविध मालमत्ता प्रकल्पात कार्यरत बिल्डर्सचे सुमारे 200 पेक्षा अधिक प्रकल्पांची माहिती नागरिकांना मिळाली. या एक्स्पोमध्ये सहभागी असलेल्या प्रत्येक विकासकाला ऑन स्पॉट बुकिंगही मिळाली तसेच नागरिकांनाही 50 हजार रुपयांपासून सुमारे दिड लाख रुपयांपर्यंतची सवलत या मालमत्तेच्या ऑनस्पॉट बुकिंगवर मिळाली.

एक्स्पोच्या शेवटच्या दिवशी भाजपचे प्रदेशाध्यक्ष आणि माजी उर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी हजेरी लावली. तसेच शहरात सुरु असलेल्या विविध प्रकल्पांची माहिती जाणून घेतली. यांच्यासह विविध चार दिवसात शहरातील विविध व्यवसायिक आणि सर्वपक्षीय राजकीय मान्यवरांनी एक्स्पोला भेट दिली. एक्स्पोच्या यशस्वी आयोजनासाठी क्रेडाई नागपूर मेट्रोचे अध्यक्ष विजय दरगन, सचिव गौरव अगरवाला, कोषाध्यक्ष राजमोहन शाहू, समन्वयक विशाल अग्रवाल, सहसचिव तारक चावला, प्रशांत सरोदे, महेश सादवानी, संतदास चावला, कार्यकारी सदस्य राहूल अग्रवाल, राहूल पिसे, विश्वास गुप्ता, अशोक चांडक, शेखर खुने, आशिष लोंढे, प्रयतीश गुजराजी, विजय ठाकूर, अभिषेक झवेरी, हेमल नादियाना, विनोद कुबडे, विजय जोशी, हेमंत मदने, श्री. जेठा यांनी परीश्रम घेतले.

शहराच्या विकासात बिल्डर्सचे मोठे योगदानः बावनकुळे

कोणत्याही शहराच्या प्रगतीची ओळख त्या ठिकाणी असलेल्या मोठ्या इमारती, मॉल्स आणि गृहप्रकल्पांपासून होत असते. त्यामुळे प्रशासनासोबतच खांद्याला खांदा लावून बिल्डर्स काम करत असतात. त्यामुळे शहराच्या विकासात बिल्डर्सचे मोठे योगदान आहे. शहरात व्यवसाय करताना कुठलीही अडचण येऊ नये, तसेच त्यांना विविध परवानग्यांसाठी चकरा माराव्या लागू नये, एवढे पारदर्शक सुविधा आपल्याला तयार करायची आहे. तसेच बिल्डर्सला व्यवसायात कोणत्याही शासकीय समस्या आल्या तर आपण तातडीने सोडवू अशी ग्वाही यावेळी चंद्रशेखर बावनकुळे यांनी उपस्थित बिल्डर्सला दिली.

 

Previous articleजस्टिस डीवाई चंद्रचूड़ होंगे देश के अगले चीफ जस्टिस, सीजेआई यूयू ललित ने की सिफारिश
Next article#Nagpur l ग्रामपंचायत निवडणूक क्षेत्रात 15, 16 व 17 ऑक्टोबरला दारुची दुकाने बंद
वाचकांनो आपन “आत्मनिर्भर खबर डॉट कॉम” ला ट्वीटर, इंस्टाग्राम आणि फेसबुक पर फॉलो करत आहात ना? अजूनपर्यंत ज्वाइन केले नसेल तर आमच्या अपडेट्स साठी आत्ताच क्लिक करा (ट्वीटर- @aatmnirbharkha1), (इंस्टाग्राम- @aatmnirbharkhabar2020), (यू ट्यूब-@aatmnirbhar khabar )(फेसबुक- @aatmnirbharkhabar2020).