Home मराठी #Nagpur l ग्रामपंचायत निवडणूक क्षेत्रात 15, 16 व 17 ऑक्टोबरला दारुची दुकाने...

#Nagpur l ग्रामपंचायत निवडणूक क्षेत्रात 15, 16 व 17 ऑक्टोबरला दारुची दुकाने बंद

374

नागपूर ब्यूरो : जिल्ह्यातील रामटेक, भिवापूर व कुही या तीन तालुक्यात 17 ग्रामपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणूका 16 ऑक्टोबर रोजी होणार असून मतमोजणी 17 रोजी तालुकास्तरावर होणार आहे. या दरम्यान कायदा व सुव्यवस्था अबांधित ठेवण्याच्या दृष्टीने या ग्रामपंचायत क्षेत्रात मतदानापूर्वीचा दिवस 15, मतदानाचा दिवस 16 व मतमोजणीचा दिवस 17 ऑक्टोबर या तीनही दिवशी सर्व अनुज्ञप्त्या (दारुची दुकाने) बंद ठेवण्याचे मनाई आदेश जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी दिले आहेत.

जिल्ह्यातील रामटेक तालूक्यात ग्रामपंचायत पुसदा पुनर्वसन-1 व 2, टांगला, भिवापूर तालुक्यात नागतरोली, नेरी सावरगाव, अड्याळ, गाडेघाट घाटउमरी पुनर्वसन, थुटानबोरी पुनर्वसन, पांजरेपार पुनर्वसन, तर कुही तालुक्यात अंभोरा, फेगड, गोन्हा, नवेगाव सोनारवाही उमरी, सिर्सी, तारोली सांवगी, तुडका, देवळीकला या 17 ग्रामपंचायत क्षेत्रात निवडणूका होत आहेत.

या क्षेत्रात दारु विकण्यास मनाईचे आदेश निर्गमित करण्यात आले आहे. या आदेशाचा भंग करणाऱ्या संबंधित अनुज्ञप्तीधारकाविरुध्द नियमानूसार सक्तीची कारवाई करण्यात येईल, असे या आदेशात नमूद आहे.

Previous article#Nagpur | क्रेडाई एक्स्पो’मुळे अनेकांचे गृहस्वप्न साकार, गुंतवणूकदारांकडूनही उदंड प्रतिसाद
Next articleकरवा चौथ पर सुहागिनों ने की पति की लंबी उम्र की कामना
वाचकांनो आपन “आत्मनिर्भर खबर डॉट कॉम” ला ट्वीटर, इंस्टाग्राम आणि फेसबुक पर फॉलो करत आहात ना? अजूनपर्यंत ज्वाइन केले नसेल तर आमच्या अपडेट्स साठी आत्ताच क्लिक करा (ट्वीटर- @aatmnirbharkha1), (इंस्टाग्राम- @aatmnirbharkhabar2020), (यू ट्यूब-@aatmnirbhar khabar )(फेसबुक- @aatmnirbharkhabar2020).