Home मराठी ’50 खोके एकदम ओके’ । कोरोनोनंतर मारबत पाहाण्यासाठी लाेटली अलोट गर्दी

’50 खोके एकदम ओके’ । कोरोनोनंतर मारबत पाहाण्यासाठी लाेटली अलोट गर्दी

423

संपूर्ण महाराष्ट्रात फक्त नागपुरातच निघणारी मारबतीची मिरवणूक सोमवारी काढण्यात आली. 137 वर्षांची परंपरा लाभलेली पिवळी आणि 141 वर्षांची परंपरा असलेली काळी मारबत मिरवणूक नागपुरचे वैशिष्ट्य आहे. तर मारबतीला चालू घडामोडींवर भाष्य करणारे निघणारे बडगे आकर्षणाचे केंद्र होते.

सध्या महाराष्ट्राचे राजकारण 50 खोक्यांवरून चांगलेच तापले आहे. पावसाळी अधिवेशनातही खोके चांगलेच गाजले. छत्रपती शिवाजी पार्क बडग्या उत्सव मंडळातर्फे 50 खोक्यांवर भाष्य करणारा बडग्या काढण्यात आला. वाढती महागाई, दुग्धजन्य पदार्थावर लावलेला जीएसटी, स्वतंत्र विदर्भाची मागणी करणारा तसेच फुटीर नेत्यांचा बडगाही आकर्षणाचे केंद्र होता.

कोरोनाच्या 2 वर्षानंतर पहिल्यांदाच निघालेली निर्बंधमुक्त मारबत मिरवणूक पाहाण्यासाठी अलोट गर्दी लोटली होती. 1880 च्या सुमारास राघोजीराजे भोसले यांची कर्तबगार, प्रभावी राजकारणपटू पत्नी बाकाबाई भोसले यांनी इंग्रजांशी हातमिळवणी करुन नागपूरकर भोसल्यांची गादी वाचवली. पण त्यांच्या दगाबाजीने नागपूरचे समाजमन क्षुब्ध झाले.

संतप्त नागरिकांनी त्या रात्री बाकाबाईचा पुतळा तयार करून त्याची मिरवणूक काढत त्याचे विसर्जन केले. या पुतळ्यायालाच ‘मारबत’ हे नाव दिले. या कामात बाकाबाईच्या पतीने तिला साथ दिली म्हणून त्यांचाही एक पुतळा तयार केल्या गेला. त्याला ‘बडग्या ‘ म्हणतात. त्याचेही विसर्जन केले गेले. पुढे बाकाबाई भोसले इंग्रजांना फितूर झाली नसून ती एक राजकीय खेळी असल्याचेही समोर आले. तेव्हापासून पडलेला रिवाज अजूनही कायम आहे.

 

Previous articleNagpur | लोगों से दुवाएं पाना ही किसी अवार्ड से कम नहीं – मोटवानी
Next articleहैद्राबाद के किम्स अस्पताल ने नागपुर के किंग्सवे अस्पताल में 51 प्रतिशत हिस्सेदारी खरीदी
वाचकांनो आपन “आत्मनिर्भर खबर डॉट कॉम” ला ट्वीटर, इंस्टाग्राम आणि फेसबुक पर फॉलो करत आहात ना? अजूनपर्यंत ज्वाइन केले नसेल तर आमच्या अपडेट्स साठी आत्ताच क्लिक करा (ट्वीटर- @aatmnirbharkha1), (इंस्टाग्राम- @aatmnirbharkhabar2020), (यू ट्यूब-@aatmnirbhar khabar )(फेसबुक- @aatmnirbharkhabar2020).