Home मराठी स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सव । 75 प्रकाराच्या तांदूळापासून विष्णू मनोहर करणार भाताचे 75...

स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सव । 75 प्रकाराच्या तांदूळापासून विष्णू मनोहर करणार भाताचे 75 प्रकार

आतापर्यंत जवळपास 11 विश्व विक्रम करणारे सुप्रसिद्ध शेफ विष्णू मनोहर येत्या रविवार 17 जुलै रोजी नवा विश्व विक्रम करणार आहेत. स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त 75 प्रकारांच्या तांदूळापासून ते भाताचे 75 प्रकार करणार आहे. यावेळी या तांदळाच्या जातीची माहितीही देण्यात येणार आहे. विष्णू मनोहर यांना हा संकल्प पूर्ण करण्यात 5 तासाचा कालावधी लागेल. हा कार्यक्रम 17 जुलै 2022 रोजी विष्णूजी की रसोई, सेंट्रल बाजार रोड, बजाज नगर चौक, नागपूर येथे होणार आहे.

प्रत्येक भात जवळपास 5 किलो तयार केला जाणार आहे, म्हणजेच एकूण 375 किलो भात या वेळेत तयार होईल. हा तयार झालेला भात सर्व खवय्यांसाठी मोफत वितरीत केला जाणार आहे. यातील काही भाग हा विशिष्ट मुलांच्या शाळा, अनाथ आश्रम, वृद्धाश्रम, अंधविद्यालय इत्यादी ठिकाणी वितरीत केला जाणार आहे.

75 प्रकारच्या तांदूळाचे वाण गोळा करणे हे काही सोपे काम नाही. त्याकरीता लातूरचे दिनेश मित्तल यांचे मोलाचे सहकार्य लाभले आहे. असे 75 प्रकारचे तांदूळ लोकांना पाहायलाही मिळणार आहेत. तांदूळाचे नाव, जात, प्रदेश आणि यापासून कुठला पदार्थ तयार होत आहे. यांची विस्तृत माहिती लोकांना सांगण्यात येईल. त्याचवेळी विष्णूजी याच तांदूळापासून भाताचे प्रकार तयार करत असतील. या कार्यक्रमाचा लाभ घेण्यासाठी लोकांनी आपले घरचे डब्बे सोबत आणावे, असे आवाहन त्यांनी केले आहे.

Previous articleनागपूर विद्यापीठाच्या परीक्षा स्थगित:अतिवृष्टीच्या इशाऱ्यामुळे घेतला निर्णय
Next articleMaharashtra । पेट्रोल 5 रुपये स्वस्त करूनही गुजरातपेक्षा 10 रुपयांनी महाग; एमपी, कर्नाटक, गोव्यातही दर कमीच
वाचकांनो आपन “आत्मनिर्भर खबर डॉट कॉम” ला ट्वीटर, इंस्टाग्राम आणि फेसबुक पर फॉलो करत आहात ना? अजूनपर्यंत ज्वाइन केले नसेल तर आमच्या अपडेट्स साठी आत्ताच क्लिक करा (ट्वीटर- @aatmnirbharkha1), (इंस्टाग्राम- @aatmnirbharkhabar2020), (यू ट्यूब-@aatmnirbhar khabar )(फेसबुक- @aatmnirbharkhabar2020).