Home मराठी Maharashtra । पेट्रोल 5 रुपये स्वस्त करूनही गुजरातपेक्षा 10 रुपयांनी महाग; एमपी,...

Maharashtra । पेट्रोल 5 रुपये स्वस्त करूनही गुजरातपेक्षा 10 रुपयांनी महाग; एमपी, कर्नाटक, गोव्यातही दर कमीच

शिंदे सरकारच्या गुरुवारच्या मंत्रिमंडळ बैठकीत इंधन स्वस्त करून महागाईत होरपळणाऱ्या जनतेला दिलासा देण्याचा प्रयत्न केला. पेट्रोलवरील प्रतिलिटर ५, तर डिझेलवरील प्रतिलिटर ३ रुपये व्हॅट कमी करण्यात आला. मध्यरात्रीपासून नवे दर लागू होतील. मात्र भाव कमी केल्यानंतरही भाजपशासित गुजरातपेक्षा १० रुपये व कर्नाटकपेक्षा ५ रुपये दर राज्यात अधिक असतील. करकपातीमुळे राज्याच्या महसुलास ६ हजार कोटी रुपयांचा फटका बसेल. मे महिन्यात देशात पेट्रोल-डिझेलने शंभरी पार केली होती.

व्हॅट कपात करताना किमान ९६ तासांनंतर तो लागू करा म्हणजे आम्हाला आर्थिक फटका बसणार नाही, अशी विनंती राज्यातील पेट्रोल पंपमालकांनी मुख्यमंत्र्यांना भेटून केली होती. मात्र नवी दरकपात १२ तासांत लागू होणार असून पंपमालकांना मोठा फटका बसणार असल्याने त्यांच्यात नाराजी आहे.

पेट्रोलवर ३२.५५ पैसे प्रतिलिटर व्हॅट होता. ५ रुपयांनी कपात केली म्हणजे ही कपात १५ टक्के आहे. डिझेलवर २२.३७ पैसे प्रतिलिटर व्हॅट होता, त्यात ३ रु. कपात केली म्हणजे कपात केवळ १३ % आहे.

भाजप विरोधी पक्षात असताना इंधनावरील व्हॅट ५० टक्के कमी करा, अशी मागणी करत होता. मग ५ आणि ३ रुपये इतकी अल्प का कमी केली, असा सवाल अजित पवार यांनी उपस्थित केला.

केंद्र सरकारने सांगूनही तत्कालीन महाविकास आघाडी सरकारने कुठलीही व्हॅट कपात केली नव्हती. केवळ करावरील करच कमी होता. आम्ही राज्यातील जनतेला दिलासा देण्याचा प्रयत्न केला आहे, असे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.

Previous articleस्वातंत्र्याच्या अमृत महोत्सव । 75 प्रकाराच्या तांदूळापासून विष्णू मनोहर करणार भाताचे 75 प्रकार
Next article#Maha_Metro | हारने वाली टीम में कोई विजेता नहीं होता और जीतने वाली टीम में कोई हारने वाला नहीं होता – डॉ. दीक्षित
वाचकांनो आपन “आत्मनिर्भर खबर डॉट कॉम” ला ट्वीटर, इंस्टाग्राम आणि फेसबुक पर फॉलो करत आहात ना? अजूनपर्यंत ज्वाइन केले नसेल तर आमच्या अपडेट्स साठी आत्ताच क्लिक करा (ट्वीटर- @aatmnirbharkha1), (इंस्टाग्राम- @aatmnirbharkhabar2020), (यू ट्यूब-@aatmnirbhar khabar )(फेसबुक- @aatmnirbharkhabar2020).