Home मराठी नागपूर विद्यापीठाच्या परीक्षा स्थगित:अतिवृष्टीच्या इशाऱ्यामुळे घेतला निर्णय

नागपूर विद्यापीठाच्या परीक्षा स्थगित:अतिवृष्टीच्या इशाऱ्यामुळे घेतला निर्णय

राज्यभरात पावसाने थैमान घातले आहे. असे असताना नागपूर विद्यापीठाच्या क्षेत्रातील बहुतेक जिल्ह्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा देण्यात आल्यामुळे 15 जुलै आणि 16 जुलै रोजी होणाऱ्या सर्व परीक्षा विद्यापीठाने स्थगित केल्या आहे.

मागील काही दिवसांपासून नागपूर तसेच जवळच्या जिल्ह्यात मुसळधार पाऊस सुरु आहे. पावसामुळे येथे बस तसेच इतर वाहतूक विस्कळीत झालेली आहे. याच कारणामुळे खबरदारी म्हणून विद्यापीठ प्रशासनाने हा निर्णय घेतला आहे.

विद्यापीठाच्या क्षेत्रात नागपूर, वर्धा, गोंदिया, भंडारा जिल्हे येतात. या सर्व ठिकाणी मुसळधार पाऊस सुरू आहे. त्याचप्रमाणे शुक्रवार आणि शनिवारी अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे. त्या पार्श्वभूमीवर विद्यापीठाने 15 व 16 जुलैला होणाऱ्या सर्व परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला आहे. या परीक्षांची नवी तारीख लवकरच जाहीर करण्यात येईल, असे विद्यापीठाच्या परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक डॉ. प्रफुल्ल साबळे यांनी सांगितले.

Previous articleआशिष देशमुख । देशात 75 छोटी राज्ये तयार करा: पंतप्रधान मोदींना पत्र; वेगळ्या विदर्भाची मागणी
Next articleस्वातंत्र्याच्या अमृत महोत्सव । 75 प्रकाराच्या तांदूळापासून विष्णू मनोहर करणार भाताचे 75 प्रकार
वाचकांनो आपन “आत्मनिर्भर खबर डॉट कॉम” ला ट्वीटर, इंस्टाग्राम आणि फेसबुक पर फॉलो करत आहात ना? अजूनपर्यंत ज्वाइन केले नसेल तर आमच्या अपडेट्स साठी आत्ताच क्लिक करा (ट्वीटर- @aatmnirbharkha1), (इंस्टाग्राम- @aatmnirbharkhabar2020), (यू ट्यूब-@aatmnirbhar khabar )(फेसबुक- @aatmnirbharkhabar2020).