Home मराठी आशिष देशमुख । देशात 75 छोटी राज्ये तयार करा: पंतप्रधान मोदींना पत्र;...

आशिष देशमुख । देशात 75 छोटी राज्ये तयार करा: पंतप्रधान मोदींना पत्र; वेगळ्या विदर्भाची मागणी

काँग्रेसचे नेते आणि माजी आमदार आशिष देशमुख यांनी 15 ऑगस्ट रोजी वेगळ्या विदर्भाची घोषणा करावी, अशी मागणी पंतप्रधान नरेंद्र मोदींकडे केली आहे. यावेळी त्यांनी भारताच्या स्वातंत्र्याच्या 75 व्या वर्षानिमित्त 75 छोटी राज्ये तयार करावी, अशी मागणी अमेरिका आणि स्वित्झर्लन्डच्या राज्यांचे उदाहरण देत केली आहे.

आपल्या राज्याची लोकसंख्येचा विचार करता ही नागरिकांच्या अपेक्षापूर्तीच्या तुलनेत जास्त आहे. त्यामुळे सुजलाम सुफलाम राज्ये घडविण्यासाठी 75 छोटी राज्ये करण्यात यावी, आा याची सुरुवात 15 ऑगस्टला वेगळ्या विदर्भाची घोषणा करून करावी असे पत्र आशिष देशमुख यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना लिहले आहे. नव्याने स्थापन झालेल्या शेजारच्या राज्यांचे दरडोई उत्पन्न दुपट्ट झाले आहे. विदर्भ मात्र मूलभूत सुविधांसाठी झगडत आहे. विदर्भात शेतकऱ्यांच्या आत्महत्या, बेरोजगारी, नक्षलवाद, असे अनेक गंभीर प्रश्न कायम दुर्लक्षित आहे. असे सांगत त्यांनी वेगळ्या विदर्भाची मागणी केली आहे.

महाराष्ट्राची परिस्थिती खालावलेली असताना तो एका राज्याएवढी लोकसंख्या असलेल्या विदर्भाच्या समस्या महाराष्ट्राकडून कशा सोडविल्या जाऊ शकतात असा प्रश्न आशिष देशमुख यांनी केला आहे. विदर्भाच्या अनेक प्रश्नांवर उत्तर कसे शोधणार असा प्रश्न ही देशमुख यांनी उपस्थित केला आहे. फक्त 29 राज्य आणि आठ केंद्रशासित प्रदेशांमुळे भारतातील विविधता अपूर्ण आणि अयोग्यरीत्या व्यक्त केली जात आहे. 75 राज्याच्या लोकसंख्या 2 कोटी असेल तर लोकसभेत प्रत्येकी 10 खासदार निवडून यावे, आणि निवडणुका एकत्रित व्हाव्यात. विदर्भ अजूनही मुलभूत सोयी सुविधासांठी झगडतोय असे सांगताना महाराष्ट्र राज्याच्या शेजारी निर्माण झालेले छोटे राज्य कसे प्रगती करते आहे याचा आढावा आशिष् देशमुख यांनी आपल्या पत्रात दिला आहे.

Previous articleसंजय राऊत । नामांतराचा निर्णय बदलणे हिंदुत्वद्रोही
Next articleनागपूर विद्यापीठाच्या परीक्षा स्थगित:अतिवृष्टीच्या इशाऱ्यामुळे घेतला निर्णय
वाचकांनो आपन “आत्मनिर्भर खबर डॉट कॉम” ला ट्वीटर, इंस्टाग्राम आणि फेसबुक पर फॉलो करत आहात ना? अजूनपर्यंत ज्वाइन केले नसेल तर आमच्या अपडेट्स साठी आत्ताच क्लिक करा (ट्वीटर- @aatmnirbharkha1), (इंस्टाग्राम- @aatmnirbharkhabar2020), (यू ट्यूब-@aatmnirbhar khabar )(फेसबुक- @aatmnirbharkhabar2020).