Home मराठी कर्तव्यात कसूर, अनिल देशमुख यांच्यावर ठपका; सीबीआय कोर्टात आरोपपत्र

कर्तव्यात कसूर, अनिल देशमुख यांच्यावर ठपका; सीबीआय कोर्टात आरोपपत्र

केंद्रीय अन्वेषण विभागाने (सीबीआय) गुरुवारी महाराष्ट्राचे माजी मंत्री अनिल देशमुख यांच्याविरुद्ध १०० कोटी रुपयांच्या वसुली प्रकरणात आरोपपत्र दाखल केले आहे. मुंबईचे माजी पोलिस आयुक्त परमबीरसिंग यांनी देशमुख यांच्यावर हे आरोप केले होते. बडतर्फ पोलिस अधिकारी सचिन वाझेला या प्रकरणात माफीचा साक्षीदार होण्याचा अर्ज मंजूर केल्यानंतर दुसऱ्या दिवशी देशमुखांविरुद्ध आरोपपत्र दाखल केले.

सीबीआयने मुंबईतील विशेष न्यायालयात अनिल देशमुख व त्यांचे सहकारी संजीव पलांडे, कुंदन शिंदे यांच्याविरुद्ध गुन्हेगारी कट आणि लाचलुचपत प्रतिबंधक कायद्यांतर्गत आरोपपत्र दाखल केले आहे. सिंग यांना मुंबई पोलिस आयुक्तपदावरून हटवल्यानंतर त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना लिहिलेल्या पत्रात देशमुख यांनी दरमहा बार आणि रेस्तराँकडून १०० कोटी रुपयांची वसुली करण्यास सांगितल्याचा आरोप केला होता.

Previous articleप्रयत्न जागतिक विक्रमाचा । अकोला-अमरावती मार्गाचे आजपासून अहोरात्र वेगवान काम;108 तासांत 75 किमी रस्ता करणार तयार
Next articleMaharashtra । आता तुम्हाला पुन्हा निर्बंध नको असतील तर शिस्त पाळा : मुख्यमंत्री ठाकरे
वाचकांनो आपन “आत्मनिर्भर खबर डॉट कॉम” ला ट्वीटर, इंस्टाग्राम आणि फेसबुक पर फॉलो करत आहात ना? अजूनपर्यंत ज्वाइन केले नसेल तर आमच्या अपडेट्स साठी आत्ताच क्लिक करा (ट्वीटर- @aatmnirbharkha1), (इंस्टाग्राम- @aatmnirbharkhabar2020), (यू ट्यूब-@aatmnirbhar khabar )(फेसबुक- @aatmnirbharkhabar2020).