Home Maharashtra प्रयत्न जागतिक विक्रमाचा । अकोला-अमरावती मार्गाचे आजपासून अहोरात्र वेगवान काम;108 तासांत 75...

प्रयत्न जागतिक विक्रमाचा । अकोला-अमरावती मार्गाचे आजपासून अहोरात्र वेगवान काम;108 तासांत 75 किमी रस्ता करणार तयार

अमरावती-अकोला हा ७५ किमीचा महामार्ग अवघ्या १०८ तासांत पूर्ण करण्याच्या विक्रमी कामाला उद्या शुक्रवारी सुरुवात होत आहे. यापूर्वी कतार येथे वेगाने रस्ते बांधकाम पूर्ण करण्याचा विक्रम झाला होता. कतारमधील कंपनीने ६ दिवसांत २५ किमीचा रस्ता बांधण्याचा विक्रम केला होता. या विक्रमाची नोंद ‘गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकाॅर्ड’मध्येही करण्यात आली होता. याच विक्रमाला उद्या मागे टाकण्याचा प्रयत्न केला जाणार आहे.


MEN & MATERIALS FOR WORLD RECORD

  • Length of Road — 75 km (single lane)
  • No of workers ——- 728
  • No of shifts ——– 3
  • Bituminous Concrete — 35,000 metric ton
  • Total no of machines —- 180
  • Hot mix plants —— 4
  • JCB —– 6

अमरावती वळण रस्त्यानंतर लोणी गावाजवळील मूर्तिजापूरच्या आधीच्या चौपदरी महामार्गावर हे अतिजलद बांधकाम केले जाईल. ५४ किमीपैकी एका बाजूच्या दोन लेनमधून ७५ किमीचा रस्ता पूर्ण करण्यात येणार आहे. शुक्रवारी, ३ जून रोजी सकाळी ७ वाजता कामाला सुरुवात होणार आहे. ७ जून रोजी दुपारपर्यत हे काम पूर्ण करण्याचे नियोजन असल्याने अहोरात्र काम सुरू राहाणार आहे. त्यासाठी वाहतूक वळवण्यापासून मनुष्यबळापर्यतची सर्व व्यवस्था पूर्ण झाल्याची माहिती महामार्ग प्राधिकरणाचे महाव्यवस्थापक विलास ब्राह्मणकर यांनी दिली.

यापूर्वी बांधला होता सांगलीचा रस्ता

राजपथ इन्फ्रा कंपनीतर्फे अमरावती-अकोला या ७५ किमी मार्गाचे वेगाने काम करण्यात येणार आहे. यापूर्वी या कंपनीने सांगली, सातारा येथे २४ तासांत ३९ किमी रस्ता बांधला होता. ‘इंडिया बुक ऑफ वर्ल्ड रेकाॅर्ड’मध्ये त्याची नोंद करण्यात आली आहे. अमरावती-अकोला महामार्गाचे काम यापूर्वी अनेक कंत्राटदारांनी अपूर्ण सोडले होते. तसेच कामाचा दर्जाही सुमार होता. या महामार्गाच्या विलंबाबद्दल केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनीही दिलगिरी व्यक्त केली होती. त्यानंतर अखेर हा रस्ता पूर्ण होत आहे.

Previous article#Maha_Metro | नागपूर शहरातील मेट्रो स्टेशनवर व्यवसायाकरिता जागा उपलब्ध
Next articleकर्तव्यात कसूर, अनिल देशमुख यांच्यावर ठपका; सीबीआय कोर्टात आरोपपत्र
वाचकांनो आपन “आत्मनिर्भर खबर डॉट कॉम” ला ट्वीटर, इंस्टाग्राम आणि फेसबुक पर फॉलो करत आहात ना? अजूनपर्यंत ज्वाइन केले नसेल तर आमच्या अपडेट्स साठी आत्ताच क्लिक करा (ट्वीटर- @aatmnirbharkha1), (इंस्टाग्राम- @aatmnirbharkhabar2020), (यू ट्यूब-@aatmnirbhar khabar )(फेसबुक- @aatmnirbharkhabar2020).