Home Maharashtra Maharashtra । आता तुम्हाला पुन्हा निर्बंध नको असतील तर शिस्त पाळा :...

Maharashtra । आता तुम्हाला पुन्हा निर्बंध नको असतील तर शिस्त पाळा : मुख्यमंत्री ठाकरे

कोविड पुन्हा डोके वर काढत आहे. दीड महिन्यात सात पटीने रुग्ण वाढले आहेत. पुढील पंधरा दिवस कोरोना रुग्णांच्या संख्येवर राज्य सरकारचे लक्ष राहिल. आता पुन्हा निर्बंध नको असतील तर नागरिकांनी स्वतःहून शिस्त पाळावी. मास्क वापरावा, लसीकरण करून घ्यावे, हात धुवावे आणि शारीरिक अंतर ठेवावे, असे आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी गुरुवारी नागरिकांना केले.

कोरोना रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेऊन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी वर्षा निवासस्थानी कोविड टास्क फोर्स समितीच्या सदस्यांची बैठक आयोजित केली होती. त्या वेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी हे आवाहन केले.

Previous articleकर्तव्यात कसूर, अनिल देशमुख यांच्यावर ठपका; सीबीआय कोर्टात आरोपपत्र
Next articleजिल्हाधिकारी आर. विमला । हा ‘विकेंड’ नागपूरकरांनी महिला सक्षमीकरणासाठी द्यावा
वाचकांनो आपन “आत्मनिर्भर खबर डॉट कॉम” ला ट्वीटर, इंस्टाग्राम आणि फेसबुक पर फॉलो करत आहात ना? अजूनपर्यंत ज्वाइन केले नसेल तर आमच्या अपडेट्स साठी आत्ताच क्लिक करा (ट्वीटर- @aatmnirbharkha1), (इंस्टाग्राम- @aatmnirbharkhabar2020), (यू ट्यूब-@aatmnirbhar khabar )(फेसबुक- @aatmnirbharkhabar2020).