Home मराठी Nagpur । दीक्षाभूमीवर शंभर बालकांना आज श्रामणेरची दीक्षा

Nagpur । दीक्षाभूमीवर शंभर बालकांना आज श्रामणेरची दीक्षा

नागपूर ब्युरो : दीक्षाभूमी स्मारक समितीचे अध्यक्ष व आंतरराष्ट्रीय धम्मगुरू भदंत आर्य नागार्जुन सुरेई ससाई यांच्या हस्ते रविवार 15 मे रोजी सायंकाळी 5 वाजता शंभर बालकांना श्रामणेरची दीक्षा देण्यात येणार आहे.

दीक्षाभूमी स्मारक समितीतर्फे बुद्धजयंतीच्या पूर्वसंध्येला दीक्षाभूमी येथे आयोजित कार्यक्रमात भिक्खू संघाचे प्रवचन होईल. यात भदंत थेरो धम्मसारथी, भदंत थेरो नागवंश, भदंत थेरो नागाप्रकाश, भिक्खूनी संघप्रिया आदी उपस्थित राहतील. श्रामणेर यांचे निवासी प्रशिक्षण दीक्षाभूमी स्मारक समितीची शाखा उंटखाना येथील सेमिनरीत होईल, अशी माहिती भदंत आर्य नागार्जुन सुरेई ससाई यांनी दिली.

Previous articleमहंगाई डायन । वस्तूंच्या किमती न वाढवता कमी केले वजन, 155 ग्रॅमचा विम बार झाला 135 ग्रॅमचा
Next articleआंतरराष्ट्रीय कुटुंब दिन । 43% लोक दररोज कुटुंबाला 3 तासांपेक्षा जास्त वेळ देतात, मोबाइलने कुटुंबात अंतर वाढवले
वाचकांनो आपन “आत्मनिर्भर खबर डॉट कॉम” ला ट्वीटर, इंस्टाग्राम आणि फेसबुक पर फॉलो करत आहात ना? अजूनपर्यंत ज्वाइन केले नसेल तर आमच्या अपडेट्स साठी आत्ताच क्लिक करा (ट्वीटर- @aatmnirbharkha1), (इंस्टाग्राम- @aatmnirbharkhabar2020), (यू ट्यूब-@aatmnirbhar khabar )(फेसबुक- @aatmnirbharkhabar2020).