Home मराठी आंतरराष्ट्रीय कुटुंब दिन । 43% लोक दररोज कुटुंबाला 3 तासांपेक्षा जास्त वेळ...

आंतरराष्ट्रीय कुटुंब दिन । 43% लोक दररोज कुटुंबाला 3 तासांपेक्षा जास्त वेळ देतात, मोबाइलने कुटुंबात अंतर वाढवले

आंतरराष्ट्रीय कुटुंब दिनानिमित्त विशेष सर्वेक्षणात लोकांनी व्यक्त केलेल्या मतांमुळे, भारतीय कुटुंब व्यवस्था आजही मजबूत आहे आणि कठीण प्रसंगी लोक पहिली मदत कुटुंबाकडेच मागतात, हे सिद्ध झाले आहे.

कुटुंब नेहमी, कुठल्याही स्थितीत मदतीसाठी तयार असते, असे लोकांचे म्हणणे आहे. या सर्व्हेत १७,९४७ लोकांनी आपले अमूल्य मत नोंदवले आहे. त्यात भारतीय कुटुंबाच्या मजबुतीची कारणे स्पष्टपणे समोर आली आहेत. पहिले, ४३.३ टक्के लोक मानतात की रोजचे काम आणि व्यग्रतेतून आम्ही रोज कुटुंबासोबत व्यतीत करण्यासाठी तीन तासांचा वेळ काढतो.

दुसरे, कोविडसारख्या कठीण काळात ७७ टक्के लोकांना कुटुंबाने भावनात्मकरीत्या सांभाळण्यास मदत केली. पण कुटुंबांत अंतरही वाढत आहे याबाबत लोकांनी चिंताही व्यक्त केली आणि त्याची दोन प्रमुख कारणे आहेत : ४४ टक्के लोकांनी म्हटले की, मोबाइलवर जास्त वेळ घालवणे हे त्याचे प्रमुख कारण आहे. त्याचबरोबर नात्यांत मान-सन्मानही घटला आहे.

Previous articleNagpur । दीक्षाभूमीवर शंभर बालकांना आज श्रामणेरची दीक्षा
Next articleनव्या तंत्रज्ञानाचा वापर करा; प्रशासन अधिक गतीशील व संवेदनशील करा – डॉ नितीन राऊत
वाचकांनो आपन “आत्मनिर्भर खबर डॉट कॉम” ला ट्वीटर, इंस्टाग्राम आणि फेसबुक पर फॉलो करत आहात ना? अजूनपर्यंत ज्वाइन केले नसेल तर आमच्या अपडेट्स साठी आत्ताच क्लिक करा (ट्वीटर- @aatmnirbharkha1), (इंस्टाग्राम- @aatmnirbharkhabar2020), (यू ट्यूब-@aatmnirbhar khabar )(फेसबुक- @aatmnirbharkhabar2020).