Home हिंदी कोरोना चा संसर्ग टाळण्यासाठी ऑनलाइन क्लासेस अत्यंत गरजेचे

कोरोना चा संसर्ग टाळण्यासाठी ऑनलाइन क्लासेस अत्यंत गरजेचे

1063

‘कोव्हिड-19’ च्या प्रकोपामुळे संपूर्ण राष्ट्र व राष्ट्रांची अर्थव्यवस्था ढवळून निघाली आहे. पण, सर्वात जास्त संभ्रमाचे वातावरण आहे ते शिक्षणक्षेत्रात. नेमके काय करावे, याबाबत एवढा संभ्रम यापूर्वी आपण कधीच अनुभवला नव्हता. शाळा कधी सुरू होणार, याबाबत कुठलीच निश्चिती नाही. क्लासेस साठी फिजिकली उपस्थित राहाणे सुद्धा अशक्य झाले आहे. अश्यावेळी ऑनलाइन क्लासेस हाच एकमात्र पर्याय उरतो आपल्या जवळ.


मोबाईल च्या माध्यमातून सहज शिकता येते

जे विद्यार्थी क्लासेस पासून दूर राहतात, ग्रामीण किंवा दुर्गम भागात राहतात असे विद्यार्थी देखील ऑनलाईन प्रणाली द्वारे शिक्षण घेऊ शकतात. साधारणतः जिल्हा स्तरावर चांगले क्लासेस उपलब्ध असतात. त्यामुळे ग्रामीण भागातून शहरात येऊन रूम करून राहणे आणि क्लासेस करणे अनेकांना अवघड जाते. अश्यांकरिता या प्रणालीचा वापर आपल्या घरात सहजच उपलब्ध असलेल्या मोबाईल च्या माध्यमातून आपण करू शकतो. अर्थात कमीत कमी खर्चात आपण गुणवत्तापूर्ण शिक्षण घेउ शकतो .

– प्रा. खान सर आणि खान मॅडम, 93703 21096, Anu Spoken English & Personality Development Institute, Chandrapur (M.S)


शिक्षण सुरु ठेवावेच लागेल

कोरोना मुळे शाळा बंद आहेत, पण शिक्षण सुरु ठेवावेच लागेल हे ध्येयमंत्र जपत ऑनलाइन शिक्षणाचे विविध मार्ग अनुसरले जात आहेत. जेणेकरून शिक्षणाचा प्रवाह अखंडित राहावा. आपल्यासाठी डिस्टन्स एडुकेशन (distance education) नवे नाही. मात्र आता हीच काळाची गरज झाली आहे. आज आपल्याला डिस्टन्स आणि डिजिटल एडुकेशन (distance and digital education) कडे लक्ष्य देण्याची जास्त गरज आहे.

घर बसल्या शिक्षण घेणे सोपे झाले

आपल्या कडे आज अनेक डिजिटल माध्यमे उपलब्ध असल्याने कोरोना चा संसर्ग वाढत असे पर्यंत आपण फिजिकली उपस्थित राहून क्लास करण्याचा अट्टहास न केलेला बरा. कारण आपली आणि आपल्या कुटुंबाची काळजी आपल्यालाच घ्यावी लागणार आहे. गुगल क्लासरूम, गुगल मीट, झूम आणि व्हॉट्सअप या पर्यायांच्या माध्यमातून आपण ऑनलाईन शिक्षण सहज घेऊ शकतो. घर बसल्या आपल्याला शिक्षण घेणे सोपे झाले आहे. यात आपला वेळ सुद्धा वाचेल.


रीडर्स आप आत्मनिर्भर खबर डॉट कॉम को ट्वीटर, इंस्टाग्राम और फेसबुक पर फॉलो कर रहे हैं ना? अबतक नहीं किया है तो अभी क्लिक करें (ट्वीटर- @aatmnirbharkha1), (इंस्टाग्राम- @aatmnirbharkhabar2020), (फेसबुक- @aatmnirbharkhabar2020और पाते रहिये हमारे अपडेट्स.

Previous article… अखेर स्थानिकांना मिळाला वेकोलिमध्ये कायमस्वरूपी रोजगार
Next articleसांसद एकजुट होकर संदेश देंगे – देश सेना के वीर जवानों के साथ है : पीएम मोदी
वाचकांनो आपन “आत्मनिर्भर खबर डॉट कॉम” ला ट्वीटर, इंस्टाग्राम आणि फेसबुक पर फॉलो करत आहात ना? अजूनपर्यंत ज्वाइन केले नसेल तर आमच्या अपडेट्स साठी आत्ताच क्लिक करा (ट्वीटर- @aatmnirbharkha1), (इंस्टाग्राम- @aatmnirbharkhabar2020), (यू ट्यूब-@aatmnirbhar khabar )(फेसबुक- @aatmnirbharkhabar2020).