Home हिंदी … अखेर स्थानिकांना मिळाला वेकोलिमध्ये कायमस्वरूपी रोजगार

… अखेर स्थानिकांना मिळाला वेकोलिमध्ये कायमस्वरूपी रोजगार

826

खा. कृपाल तुमाने यांचा पुढाकार, चार दिवसांपासून सुरु होते आंदोलन

नागपूर : उमरेड परीक्षेत्रातील मकरधोकडा दिनेश खाणीत आंदोलन करणाऱ्या स्थानिक कामगार युवकांना कायम करण्यात येणार आहे. रामटेकचे खासदार कृपाल तुमाने यांनी आंदोलकांची भेट घेतल्यावर वेकोलि व कंत्राटदार कंपनीच्या अधिकाऱ्यांशी चर्चा करून त्यांच्या मागण्या मान्य करून घेतल्या. किमान वेतन मिळत नसल्याने 60 कामगार मागील चार दिवसांपासून आंदोलन करीत होते.

मकरधोकडा येथील दिनेश खाणीत सैनिक माईन्स या कंपनीला वेकोलिने कोळसा खणनाचे कंत्राट दिले आहे. सैनिक माईन्सने स्थानिक युवकांना कामगार म्हणून घेतले आहे. वेकोलिमध्ये नोकरी मिळणार या आशेत स्थानिक युवक कमी वेतनात कंत्राटदार कंपनीत काम करीत होते, याशिवाय कोणत्याही प्रकारच्या सुविधा त्यांना अद्याप देण्यात आल्या नव्हत्या. यामुळे त्रस्त झालेल्या 60 कामगारांनी त्यांच्या न्याय मागण्यासाठी 9 सप्टेंबर पासून आंदोलन सुरु केले होते.

शनिवारी खासदार कृपाल तुमाने यांनी आंदोलन स्थळी जाऊन आंदोलक, स्थानिक कामगारांची भेट घेतली होती. त्यांच्या समस्या व अडचणी जाणून घेतल्या. यांनतर वेकोलि उमरेड क्षेत्राचे अधिकारी व कंत्राटदार सैनिक माईन्स कंपनीच्या अधिकाऱ्यांना आंदोलन स्थळी बोलावून त्यांना केंद्र सरकार व वेकोलिने केलेले खान क्षेत्रात स्थानिकांना रोजगार नियमांची आठवण करून दिली. सोबतच वेकोलिच्या कोणत्याही कामावर असलेल्या प्रत्येक स्थानिक कामगारांना किमान वेतन मिळावे याची जबाबदारी वेकोलिने घ्यावी अशा सूचना केल्या. अन्यथा दिनेश खान स्थानिक नागरिक बंद करतील असा इशारा दिला.

खासदार कृपाल तुमाने यांनी केलेल्या सर्व सूचना वेकोलिने मान्य करून किमान वेतन देण्याची तयारी दर्शविली. सोबतच कामगारांच्या इतर मागण्या मान्य करण्याचेही आश्वासन दिले. यावेळी खासदार कृपाल तुमाने यांच्यासह शिवसेना उपजिल्हाप्रमुख मंगल पांडे, तालुका प्रमुख संजय लडी, राष्ट्रीय किसान क्लबचे अध्यक्ष व शिवसेनेचे नंदकिशोर दंडारे, हेवती चे सरपंच सुरेखा वाघ, हेवती पुनर्वसन समिती चे अध्यक्ष विठ्ठल हुल्के, हेवती चे उपसरपंच भिकाजी भोयर, रमेश धाबेकर, पंचफुला कुहिटे, अमित कातोरे, सोहेल अहमद, वेकोलिचे अधिकारी सूर्यवंशी, गुप्ता, उमरेडचे ठाणेदार विलास काळे यांच्या समवेत कामगार, गावकरी व शिवसेना कार्यकर्ते उपस्थित होते.

Previous articleजानिए बड़ा रिटायरमेंट फंड तैयार करने के लिए कौन-सी योजना रहेगी बेहतर
Next articleकोरोना चा संसर्ग टाळण्यासाठी ऑनलाइन क्लासेस अत्यंत गरजेचे
वाचकांनो आपन “आत्मनिर्भर खबर डॉट कॉम” ला ट्वीटर, इंस्टाग्राम आणि फेसबुक पर फॉलो करत आहात ना? अजूनपर्यंत ज्वाइन केले नसेल तर आमच्या अपडेट्स साठी आत्ताच क्लिक करा (ट्वीटर- @aatmnirbharkha1), (इंस्टाग्राम- @aatmnirbharkhabar2020), (यू ट्यूब-@aatmnirbhar khabar )(फेसबुक- @aatmnirbharkhabar2020).