Home मराठी नागपूर संघ मुख्यालयात रेकी:अनेक ठिकाणी दहशतवादी हल्ल्याचा इशारा, पोलिस आयुक्तांचा दुजोरा

नागपूर संघ मुख्यालयात रेकी:अनेक ठिकाणी दहशतवादी हल्ल्याचा इशारा, पोलिस आयुक्तांचा दुजोरा

636

नागपुरात मोठा दहशतवादी हल्ला होऊ शकतो. पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनी शुक्रवारी ही भीती व्यक्त केली आहे. कुमार म्हणाले की, ‘जैश-ए-मोहम्मद’ ही दहशतवादी संघटना शहरात मोठे दहशतवादी हल्ले घडवण्याची योजना आखत आहे. त्यांच्या माणसांनी RSS मुख्यालयासह शहरातील प्रमुख ठिकाणे शोधून काढली आहेत.

या माहितीनंतर आरएसएस मुख्यालयाची सुरक्षा वाढवण्यात आली आहे. या प्रकरणी नागपूर पोलिसांनी अज्ञातांविरुद्ध UAPA अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. गुन्हे शाखेचे पथक या प्रकरणाचा तपास करत आहे.

पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनी दिलेल्या माहितीनुसार, संशयितांनी नागपूरच्या अनेक प्रसिद्ध ठिकाणांचे फोटो काढले असून त्यांचे व्हिडिओही बनवले आहेत. संपूर्ण शहरात नाकाबंदी करण्यात आली असून बाहेरून येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीचे ओळखपत्र तपासले जात आहे. या माहितीनंतर सर्व पोलिसांच्या सुट्या रद्द करण्यात आल्याचे पोलिस आयुक्तांनी सांगितले. शहरातील सर्व प्रमुख ठिकाणी आत आणि बाहेर बसविण्यात आलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची पडताळणी केली जात आहे. उपराजधानीशी जोडलेल्या सर्व महामार्गांवर अवजड वाहनांची सखोल तपासणी सुरू करण्यात आली आहे.