Home मराठी अमृता फडणवीसांची विद्या चव्हाण यांना नोटीस, ‘डान्सिंग डॉल’ म्हणून केला होता उल्लेख

अमृता फडणवीसांची विद्या चव्हाण यांना नोटीस, ‘डान्सिंग डॉल’ म्हणून केला होता उल्लेख

551

भाजप आयटी सेलच्या प्रमुखाने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या पत्नी रश्मी ठाकरे यांचा “महाराष्ट्राच्या राबडीदेवी’ असा उल्लेख केल्याने वाद उद्भवला होता. त्यावर प्रतिक्रिया देताना राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या आणि माजी आमदार विद्या चव्हाण यांनी माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांचा ‘डान्सिंग डाॅल’ असा उल्लेख केला होता. त्याला आक्षेप घेत अमृता फडणवीस यांनी चव्हाण यांना अब्रुनुकसानीबाबत माफी मागण्याची नोटीस शुक्रवारी (७ जानेवारी) पाठवली आहे.

अमृता फडणवीस यांनी वकिलामार्फत विद्या चव्हाण यांना पाठवलेली नोटीस आपल्या ट्विटर हँडलवर पोस्ट केली आहे. तसेच अमृता यांनी चव्हाण यांना इशारा देणारे काव्यमय ट्वीट पोस्ट केले आहे. त्यांनी विद्या चव्हाण यांना ४८ तासांत पत्रकार परिषद घेऊन माफी मागण्यास सांगितले आहे. आपण केलेली वक्तव्ये ही पूर्णपणे निराधार असून आपण ती मागे घेत असल्याचे विद्या चव्हाण यांनी जाहीर करावे. असे न केल्यास, त्यांच्याविरुद्ध आयपीसी ४९९ व ५०० अंतर्गत गुन्हा दाखल करून मानहानीचा खटला दाखल करण्याचा इशारा अमृता फडणवीस यांनी दिला आहे. या वादामुळे पुन्हा एकदा भाजप विरुद्ध महाविकास आघाडी सरकार हा सामना रंगायला सुरुवात झाली आहे. दुसरीकडे, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याविरुद्ध आक्षेपार्ह ट्वीट करणारे नवी मुंबईतील भाजपचे माजी नगरसेवक संदीप म्हात्रे यांना अटक करण्यात आली आहे.

अमृता फडणवीस यांनी आपल्या वकिलामार्फत पाठवलेली नोटीस टि्वटरवर पोस्ट केली आहे. त्याचसोबत त्यांनी लिहिले आहे की, ‘आपल्याच सुनेच्या आणि पुरोगामी स्त्रियांच्या चारित्र्याचा जी करते अपमान, ती आहे नेता विद्याहीन चव्हाण. आता कोर्टातच जाऊन साफ करावी लागेल, तिने पसरवलेली सगळी विषारी घाण. मानहानीची नोटीस वाच आणि सुधार स्वतःला, मगच मिळेल तुला निर्वाण!’

आपण अमृता यांना ‘डान्सिंग डाॅल’ असा शब्द वापरला होता. मात्र तो काही मानहानीकारक नाही, असा दावा विद्या चव्हाण यांनी केला आहे. या शब्दामुळे अमृता यांची कुठे बदनामी होते, असा प्रश्न करत आपल्याला नोटीस मिळालेली नसून मिळाल्यावर त्याला योग्य उत्तर देऊ, असे त्या म्हणाल्या. भाजपवाल्यांना माझ्या घरात नाक खुपसण्याची गरज नाही. चांगले काम करणाऱ्यांची बदनामी सुरू असल्याचा आरोपही त्यांनी केला.

Previous article#Covid_19 | ज्या वेगाने रुग्ण वाढताहेत, त्याच वेगाने ते घटतीलही : तज्ज्ञांचे मत
Next articleनागपूर संघ मुख्यालयात रेकी:अनेक ठिकाणी दहशतवादी हल्ल्याचा इशारा, पोलिस आयुक्तांचा दुजोरा
वाचकांनो आपन “आत्मनिर्भर खबर डॉट कॉम” ला ट्वीटर, इंस्टाग्राम आणि फेसबुक पर फॉलो करत आहात ना? अजूनपर्यंत ज्वाइन केले नसेल तर आमच्या अपडेट्स साठी आत्ताच क्लिक करा (ट्वीटर- @aatmnirbharkha1), (इंस्टाग्राम- @aatmnirbharkhabar2020), (यू ट्यूब-@aatmnirbhar khabar )(फेसबुक- @aatmnirbharkhabar2020).