Home मराठी राजकीय फायद्यासाठी पंतप्रधानपदाची प्रतिष्ठा भाजपने धुळीला मिळवली : नाना पटोले

राजकीय फायद्यासाठी पंतप्रधानपदाची प्रतिष्ठा भाजपने धुळीला मिळवली : नाना पटोले

619

पंजाबातील घटनेनंतर भाजप नेत्यांची वक्तव्ये, पंतप्रधानांचे ‘जिवंत परत आलो’ हे विधान आणि त्यानंतर राष्ट्रपतींची भेट घेणे हा घटनाक्रम लक्षात घेता शेतकरी आंदोलनामुळे गेलेली पत सुधारण्यासाठी भाजपने हे सर्व ठरवून केले असून नरेंद्र मोदी आणि भाजपने राजकीय फायद्यासाठी पंतप्रधानपदाची प्रतिष्ठा धुळीस मिळवली, असा आरोप काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी शुक्रवारी (७ जानेवारी) केला.

पंतप्रधानांच्या पंजाब दौऱ्यात सुरक्षेच्या त्रुटीचे प्रकरण हे ठरवून केलेला डाव आहे. पंतप्रधानांचा कार्यक्रम अचानक का बदलण्यात आला, त्यामागे काय हेतू होता, असा सवालही पटोले यांनी भाजपला केला आहे. काँग्रेसच्या डिजिटल सदस्यता नोंदणी मोहिमेचा शुभारंभ आज टिळक भवनमध्ये पार पडला. या वेळी प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींशी बोलताना पटोले यांनी भाजपवर टीकास्त्र सोडले. पटोेले म्हणाले की, पंतप्रधान हे देशाचे आहेत, त्यांची सुरक्षा महत्त्वाची आहे.

त्यांच्या सुरक्षेशी कोणतीही तडजोड होता कामा नये. याप्रकरणी पंजाबचे मुख्यमंत्री चन्नी यांनी सविस्तर प्रकाश टाकलेला आहेच. भाजपकडून जाणीवपूर्वक याला राजकीय रंग देत काँग्रेसला बदनाम करण्याचे काम केले जात आहे. या घटनेला भाजपने एक इव्हेंट बनवले आहे, असा आरोप त्यांनी केला.

पंतप्रधानांची सुरक्षा ही एसपीजीकडे असते. अनेक महत्त्वाच्या केंद्रीय यंत्रणा त्यात सहभागी असतात म्हणून भाजपने थेट केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या घरासमोरच आंदोलन करून त्यांना जाब विचारावा, असा सल्लाही पटोले यांनी दिला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ताफ्याजवळ जे लोक गेले होते ते भाजपचे कार्यकर्ते होते. तेथे “नरेंद्र मोदी जिंदाबाद’च्या घोषणा दिल्या जात होत्या, असे पटोले म्हणाले.

Previous articleनागपूर संघ मुख्यालयात रेकी:अनेक ठिकाणी दहशतवादी हल्ल्याचा इशारा, पोलिस आयुक्तांचा दुजोरा
Next articleरिलायंस जियो इस साल ला सकती है IPO, 100 अरब डॉलर हो सकता है वैल्यूएशन
वाचकांनो आपन “आत्मनिर्भर खबर डॉट कॉम” ला ट्वीटर, इंस्टाग्राम आणि फेसबुक पर फॉलो करत आहात ना? अजूनपर्यंत ज्वाइन केले नसेल तर आमच्या अपडेट्स साठी आत्ताच क्लिक करा (ट्वीटर- @aatmnirbharkha1), (इंस्टाग्राम- @aatmnirbharkhabar2020), (यू ट्यूब-@aatmnirbhar khabar )(फेसबुक- @aatmnirbharkhabar2020).