Home हिंदी नागपूरचे जिल्हाधिकारी रवींद्र ठाकरे कोरोना पॉझिटिव्ह, लक्षणें नाहीत

नागपूरचे जिल्हाधिकारी रवींद्र ठाकरे कोरोना पॉझिटिव्ह, लक्षणें नाहीत

733

नागपूरचे जिल्हाधिकारी रवींद्र ठाकरे कोरोना पॉझिटिव्ह निघाल्याचे वृत्त हाती आले आहे. माहितीनुसार त्यांची कोविड रिपोर्ट कालच मिळाली असून ती पॉझिटिव्ह आहे.

मात्र त्यांचात लक्षणें नसल्याचे कळते. मुख्य म्हणजे या अगोदर नागपुर चे मनपा आयुक्त तुकाराम मुंढे यांची कोविड रिपोर्ट पॉझिटिव्ह आली होती. त्यांनी 14 दिवसाचा काळ घरीच पूर्ण केला व आता ते पूर्णपणे बरे झाले आहेत.

जिल्ह्यात 1803 रुग्णांना डिस्चार्ज, 2205 पॉझिटिव्ह तर 34 मृत्यू

जिल्ह्यात आज (8 सप्टेंबर) 1803 रुग्ण बरे होऊन घरी गेले . आज 2205 नवीन रुग्णांची भर पडली असून एकूण पॉझिटिव्ह रुग्ण संख्या 43257 झाली आहे. आता पर्यन्त बरे होऊन घरी गेलेल्या रुग्णांची संख्या 30461 झाली आहे. एकूण क्रियाशील रुग्ण 11377 असून पैकी 6050 गृह विलगिकरणात आहेत. आज 34 मृत्यु झाले असून त्यापैकी 2 मृत्यू जिल्ह्याबाहेरचे आहे. रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 70.45 टक्के झाले आहे, असे प्रशासनाने सांगितले आहे.

अफवेवर द्याव लागलं होतं स्पष्टीकरण

‘नागपूरचे जिल्हाधिकारी रवींद्र ठाकरे खुद्द कोरोना बाधित झाले आहे. त्यांना कोरोनाची लागण झाली असून त्यांना रुग्णालयात दाखल केले आहे’, अशी खोटी बातमी काही माध्यमांवर मार्च महिन्यात दाखवण्यात आली होती. त्यामुळे सर्व धावपळीतून वेळ काढून जिल्हाधिकाऱ्यांना ‘मला कोरोना झालेला नाही, मी ठणठणीत आहे’, असं सांगण्याची वेळ आली होती.