Home Covid-19 #Maharashtra । ‘ओमिक्रॉन’ व्हेरिएंटची दहशत, मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी बोलावली बैठक

#Maharashtra । ‘ओमिक्रॉन’ व्हेरिएंटची दहशत, मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी बोलावली बैठक

502
दक्षिण आफ्रिकेत कोरोनाचा नवा व्हेरिएंट आढळल्याने जगात पुन्हा एकदा चिंताजनक वातावरण आहे. भारतात गेल्या काही दिवसांपासून कोरोनाचा वेग मंदावला आहे. मात्र या नव्या ओमिक्रॉन व्हेरिएंटची खबरदारीसाठी राज्य सरकार पाऊले उचलताना दिसत आहे.

राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज संध्याकाळी 5.30 वाजता तातडीची बैठक बोलावली आहे. दक्षिण आफ्रिकेतून येणाऱ्या प्रत्येक प्रवाशाला विमानतळावर 14 दिवस विलगीकरणात राहावे लागेल. असे निर्बंध लादल्यात आले आहे.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे सायंकाळी 5:30 वाजता राज्यातील सर्व विभागीय आयुक्त आणि सर्व जिल्हाधिकाऱ्यांनी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून संवाद साधणार आहेत. मुख्यमंत्री कार्यालयाने दिलेल्या माहितीप्रमाणे मुख्यमंत्री राज्यातील कोरोना परिस्थितीचा आढावा घेणार आहेत.

राज्यातील दैनंदिन कोरोना रुग्णांची संख्या घटत चालली आहे. त्यामुळे राज्य सरकारने बरेच निर्बंध शिथिल केले होते. पहिलीपासून शाळा सुरू करण्याचा निर्णयही घेण्यात आलेला आहे. तर उर्वरित निर्बंधही हळूहळू शिथिल केले जाणार असल्याचे बोलले जात असतानासच आता नव्या व्हेरिएंटने चिंता वाढवली आहे. त्यामुळे राज्य सरकार नेमकी काय भूमिका घेणार याकडे राज्यातील जनतेचे लक्ष असणार आहे.

केंद्र सरकार देखील सतर्क

दक्षिण आफ्रिक आळलेल्या नव्या व्हेरिएंटच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकार देखील सज्ज झाल्याचे पाहायला मिळत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी उच्चस्तरिय अधिकाऱ्यांची शनिवारी बैठक घेतली. त्यात त्यांनी कोरोना परिस्थितीचा आढावा घेतला असून, नवा व्हेरिएंटला रोखण्यासाठी काय करण्यात यावे. याविषयी तज्ञांसोबत चर्चा केली आहे.

महाराष्ट्र सरकारने तातडीने काही निर्बंध लागू केले असून, आफ्रिकन देशांसह परदेशातून मुंबईत येणाऱ्या प्रवाशांना क्वारंटाईन आणि चाचण्यांचा निर्णय घेण्यात आला आहे. ओमिक्रॉन व्हेरिएंटमध्ये डेल्टापेक्षाही अधिक म्युटेशन आढळून आल्याने त्यांच्या संसर्गाचा वेग प्रचंड असल्याचे शास्त्रज्ञांकडून सांगितले जात आहे.

Previous article#WHO | चीफ साइंटिस्ट ने कहा- नए वैरिएंट के खिलाफ मास्क ही होगा बड़ा हथियार
Next article#Covid । मास्क म्हणून रुमाल वापराल तर 500 रुपये दंड; संपूर्ण लसीकरण झालेल्यांनाच सार्वजनिक ठिकाणी जाण्याची मुभा
वाचकांनो आपन “आत्मनिर्भर खबर डॉट कॉम” ला ट्वीटर, इंस्टाग्राम आणि फेसबुक पर फॉलो करत आहात ना? अजूनपर्यंत ज्वाइन केले नसेल तर आमच्या अपडेट्स साठी आत्ताच क्लिक करा (ट्वीटर- @aatmnirbharkha1), (इंस्टाग्राम- @aatmnirbharkhabar2020), (यू ट्यूब-@aatmnirbhar khabar )(फेसबुक- @aatmnirbharkhabar2020).