Home Nagpur विधान परिषद निवडणूक | छोटू भोयर यांनी बँकेचे 348 लाख बुडविल्या प्रकरणी...

विधान परिषद निवडणूक | छोटू भोयर यांनी बँकेचे 348 लाख बुडविल्या प्रकरणी नोटिस

401

नागपुर नागरी सहकारी बँकेच्या सीईओंनी निवडणूक आयुक्तांना लिहिले पत्र


नागपूर ब्यूरो : महाराष्ट्रात होऊ घातलेल्या विधान परिषद निवडणुकांना घेऊन प्रमुख राजकीय पक्ष असलेल्या काँग्रेस आणि भाजप मध्ये नुकतीच चर्चा होऊन राज्यातील जास्तीत जास्त विधान परिषदेच्या जागेवर सहमतीने निर्णय घेऊन निवडणूक टाळण्यात आली आहे. मात्र नागपुरात हे शक्य न झाल्याने इथे काँग्रेस विरुद्ध भाजप असा सामना रंगणार आहे. काँग्रेस कडून छोटू उर्फ रवींद्र भोयर आणि भाजप कडून माजी मंत्री चंद्रशेखर बावनकुळे रिंगणात आहेत.

हा सामना रंगन्यापूर्वीच नागपूर नागरी सहकारी बँकेने एक पत्र निवडणूक आयुक्तांना पाठवून ही माहिती दिली आहे की काँग्रेसचे उमेदवार छोटू भोयर यांनी बँकेचे 348 लाख रुपये बुडविले आहे. या पत्रानंतर निवडणुकीपूर्वीच प्रचंड खळबळ माजली आहे. दुसरीकडे निवडणूक आयुक्तांना लिहिलेल्या या पत्रामुळे आता छोटू भोयर अडचणीत येणार काय? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

नागपूर नागरी सहकारी बँकेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी निवडणूक आयुक्तांना लिहिलेल्या आपल्या पत्रात असे म्हटले आहे की रवींद्र भोयर यांच्या लता किशन इन्फ्रा प्रायव्हेट लिमिटेड कंपनीवर 348 लाख रुपये शिल्लक आहेत. सदर राशी वसूल करण्यासाठी अनेक वेळा बँकेकडून प्रयत्न करण्यात आले. मात्र याचा फायदा झाला नाही. सरतेशेवटी नाइलाजाने बँकेने नॅशनल लॉ ट्रिब्यूनल मध्ये याविरोधात तक्रार नोंदविली आहे. सदर प्रकरण प्रलंबित आहे.

बँकेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी म्हटले आहे की नुकतेच काँग्रेसकडून छोटू उर्फ रवींद्र भोयर यांनी नामनिर्देशन पत्र दाखल केले आहे. त्यामुळे या प्रकरणाची माहिती निवडणूक आयुक्तांना देणे बँकेला आवश्यक वाटले.

बँकेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी निवडणूक आयुक्तांना लिहिलेल्या पत्रात असेही म्हटले आहे की या प्रकरणात त्यांच्याकडून रवींद्र भोयर यांना नोटीस बजावण्यात आला असून सदर नोटीस ची कॉपी निवडणूक आयुक्तांना या पत्रासोबत पुरविण्यात आली आहे. बँके च्या मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी या प्रकरणात सदर बाब गांभीर्याने घेण्याची मागणी सुद्धा निवडणूक आयुक्तांना केलेली आहे. बँकेच्या या पत्रामुळे काँग्रेस पक्षाचे उमेदवार छोटू उर्फ रवींद्र भोयर अडचणीत येणार काय याकडे आता सर्वांचे लक्ष लागलेले आहे. या संबंधात छोटू भोयर यांची प्रतिक्रिया अजून कळलेली नाही.

Previous articleउद्धव ठाकरे अपघाताने झालेले मुख्यमंत्री, ही तर महा विश्वासघातकी आघाडी सरकार : जावडेकर
Next article35 साल बाद पूर्व विद्यार्थियों की रीयूनियन, मिले तो फिर ताजा हुई पुरानी यादें
वाचकांनो आपन “आत्मनिर्भर खबर डॉट कॉम” ला ट्वीटर, इंस्टाग्राम आणि फेसबुक पर फॉलो करत आहात ना? अजूनपर्यंत ज्वाइन केले नसेल तर आमच्या अपडेट्स साठी आत्ताच क्लिक करा (ट्वीटर- @aatmnirbharkha1), (इंस्टाग्राम- @aatmnirbharkhabar2020), (यू ट्यूब-@aatmnirbhar khabar )(फेसबुक- @aatmnirbharkhabar2020).