गडचिरोली सारख्या नक्षल ग्रस्त भागात नेहमीच बांधकामात भ्रष्टाचार होत असल्याची ओरड होत असते. मात्र सरकारी यंत्रणांनी मनात आणले तर कसे नियोजन केले जाऊ शकते याचे उदहारण म्हणजे धानोरा तालुक्यातील करमरका येथे उभारण्यात आलेला पहिला पुल कम बंधारा. यामुळे वाहतूक तर सुरळीत होईलच सोबतीला 10 गावांना सिंचनाचा फायदा होणार आहे. या पुलाची निर्मिति बघितली कि आपसुकच तोंडातून निघते, “व्हाट एन आइडिआ सरजी!”
या पुलावर 3 कोटी 65 लक्ष रुपये खर्च झाले आहेत. त्यातच 40 लक्ष रुपयांचा बंधारा बांधण्यात आल्याने ‘एक के साथ एक फ्री’ संकल्पना कामात आली आहे. बंधाऱ्यात सध्या 4 किमी पर्यन्त पानी साचले आहे.