Home Maharashtra @NCPspeaks | राष्ट्रवादी काँग्रेस चे गोंदिया जिल्हाध्यक्ष विजय शिवणकर यांचा पक्षाला रामराम

@NCPspeaks | राष्ट्रवादी काँग्रेस चे गोंदिया जिल्हाध्यक्ष विजय शिवणकर यांचा पक्षाला रामराम

1501

गोंदिया ब्यूरो : राष्ट्रवादी कांग्रेस पक्षाने गोंदिया जिल्हाध्यक्ष पदी नियुक्ति करून काही काळच लोटला असतांना पक्षांतर्गतच्या राजकारणाला कंटाळून जिल्हाध्यक्ष विजय महादेवराव शिवणकर यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. त्यांनी आपला राजीनामा राकांपाच्या प्रदेशाध्यक्षांना पाठविला आहे.

गोंदिया येथील राष्ट्रवादी कांग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष विजय महादेवराव शिवणकर यांनी नुकतेच पत्र लिहून राकांपा चे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटिल यांना आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. त्यांचे म्हणणे आहे कि माझी नियुक्ति काही दिवसांपूर्वी आपण केली होती. परंतु गोंदिया राकांपा मध्ये अंतर्गत राजकीय वातावरण बरोबर नाही. समन्वय आणि सामनजस्याचा खूप अभाव आहे. त्यामुळे सदर जवाबदारी संभाळने मला शक्य होत नाही.

मी मागील सात वर्षांपासून राकांपा चा सक्रीयतेने काम करीत आहे. पक्षाने वेळोवेळी दिलेली जवाबदारी मी पूर्ण निष्ठेने पार पाडली. निवडणूकीत परिणामही सार्थक करून दाखविले. परंतू माझ्या कामाचे मूल्यांकनाची दखल घेण्यात आली नाही. काही घटना माझ्या सोबत चुकीच्या घडल्या. ज्याचा उल्लेख करणे बरोबर नाही. त्यामुळे माझ्या भावना खूप दुखावल्या आहेत.

त्यांनी गोंदिया जिल्हाध्यक्ष पदाचा राजीनामा देण्यासोबतच राकांपा च्या प्राथमिक सदस्यत्वाचा सुद्धा राजीनामा दिला आहे. त्यांनी आपल्या राजीनाम्याची प्रत उपमुख्यमंत्री अजित पवार आणि माजी केंद्रीय मंत्री प्रफुल पटेल यांना सुद्धा पाठविला आहे.

Previous article#Tariq Anwar । विहिंप, बजरंग दलावर बंदी का आणू नये? तारीक अन्वर यांचा सवाल
Next article#Nagpur | माधव नेत्रालय में हर्षोल्लास के साथ मनाया बाल दिवस
वाचकांनो आपन “आत्मनिर्भर खबर डॉट कॉम” ला ट्वीटर, इंस्टाग्राम आणि फेसबुक पर फॉलो करत आहात ना? अजूनपर्यंत ज्वाइन केले नसेल तर आमच्या अपडेट्स साठी आत्ताच क्लिक करा (ट्वीटर- @aatmnirbharkha1), (इंस्टाग्राम- @aatmnirbharkhabar2020), (यू ट्यूब-@aatmnirbhar khabar )(फेसबुक- @aatmnirbharkhabar2020).