Home Congress #Tariq Anwar । विहिंप, बजरंग दलावर बंदी का आणू नये? तारीक अन्वर...

#Tariq Anwar । विहिंप, बजरंग दलावर बंदी का आणू नये? तारीक अन्वर यांचा सवाल

503
नागपूर ब्युरो : अमरावतीतील दगडफेक प्रकरणात रजा अकॅदमीवर बंदी आणा, अशी मागणी विश्व हिंदू परिषद, बजरंग दल यांच्यावतीनं केली जात आहे. यावर अखिल भारतीय काँग्रेसचे महासचिव तारीक अन्वर यांनी प्रहार केला. विश्व हिंदू परिषद, बजरंग दल हेसुद्वा अशाप्रकारच्या दंगली घडवितात. त्यामुळे त्यांच्यावरही बंदी का आणू नये, असा सवाल अन्वर यांनी केला. नागपुरात ते पत्रकारांशी काल बोलत होते.

तारीक अन्वर म्हणाले, संविधानापेक्षा देशात कोणीही मोठा नाही. विश्व हिंदू परिषद, बजरंग दल यांच्याकडून नेहमी समाजात तेढ निर्माण करण्याचे काम केले जाते. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अशी तणावाची परिस्थिती निर्माण केली जात आहे. राजकीय लाभ मिळविण्याचा डाव आखला जात आहे. महाराष्ट्राला बदनाम केले जात आहे. कोरोनाकाळात गंगेत वाहणारे मृतदेह साऱ्यांनी बघीतले. अशा मुद्यांवरून लक्ष विचलित करण्याचा प्रयत्न केला जात आहे. दिवसेंदिवस महागाई वाढत आहे. बेरोजगारांची फौज तयार होत आहे. त्यावरून लक्ष विचलित करण्यासाठी अमरावतीसारख्या दंगली घडवून आणल्या जात आहेत, असा आरोपही अन्वर यांनी यावेळी केली.

देशातील समस्यांबाबत जनजागृती करण्यासाठी काँग्रेसतर्फे 14 ते 29 नोव्हेंबरपर्यंत अभियान राबविले जात आहे. यात काँग्रेसचे पदाधिकारी, कार्यकर्ते घरोघरी जाऊन जनजागृती करणार आहेत. या अभियानाच्या प्रचारासाठी तारिक अन्वर नागपुरात आले असता त्यांनी विहिंप, बजरंग दलावर प्रहार केला. निवडणुकीच्या काळात पुलवामा सारखे प्रकरण घडवून आणण्यात आले.

धार्मिक तेढ निर्माण करण्याचे काम भाजपकडून नेहमी केले जाते, असेही ते म्हणाले. नागपुरात ऑल इंडिया कौमी तंजीमच्या वतीने आयोजित कार्यक्रमात त्यांनी हजेरी लावली. या पत्रकार परिषदेला काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, आमदार विकास ठाकरे उपस्थित होते.

काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले म्हणाले, देशात दंगली घडवा आणि त्याचा राजकीय फायदा करून घ्या, असा भाजपचा एकसूत्री कार्यक्रम आहे. भाजपतर्फे पेट्रोल, डिझेल दरवाढीविरोधात आंदोलन सुरू आहे. केंद्राने आधी इंधनाचे दर वाढविले. नंतर पाच रुपये लीटरमागे कमी केले. राज्य सरकारही इंधनावरील दर कपातीवर विचार करत आहे. राज्याकडून इंधनावरील करकपातीचा निर्णय होऊ शकतो, असे संकेत पटोले यांनी दिले.

Previous article#Maharashtra । उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते श्री विठ्ठल रुक्मिणीची शासकीय पूजा, 2 लाखांवर भाविक दाखल
Next article@NCPspeaks | राष्ट्रवादी काँग्रेस चे गोंदिया जिल्हाध्यक्ष विजय शिवणकर यांचा पक्षाला रामराम
वाचकांनो आपन “आत्मनिर्भर खबर डॉट कॉम” ला ट्वीटर, इंस्टाग्राम आणि फेसबुक पर फॉलो करत आहात ना? अजूनपर्यंत ज्वाइन केले नसेल तर आमच्या अपडेट्स साठी आत्ताच क्लिक करा (ट्वीटर- @aatmnirbharkha1), (इंस्टाग्राम- @aatmnirbharkhabar2020), (यू ट्यूब-@aatmnirbhar khabar )(फेसबुक- @aatmnirbharkhabar2020).