Home हिंदी नागपूर मेट्रोच्या स्थानकावर झाशी ची राणी लक्ष्मीबाई यांचे तैलचित्र बनले आकर्षणाचे केंद्र

नागपूर मेट्रोच्या स्थानकावर झाशी ची राणी लक्ष्मीबाई यांचे तैलचित्र बनले आकर्षणाचे केंद्र

468
0

नागपूर: नागपूर मेट्रो प्रकल्पाअंतर्गत असलेल्या एक्वा मार्गिकेवर झांसी राणी स्टेशन येथे राणी लक्ष्मीबाई यांचे तैल चित्र (म्युरल) बसविले आहे. या तैल चित्राने शहराच्या गजबजलेल्या झांसी राणी चौक येथील या मेट्रो स्थानकाचे सौंदर्य अधिकच खुलले आहे.

अश्या प्रकारची कुठलीही कलाकृती मेट्रोच्या परिसरात उभारल्याचे हे दुसरे उदहरण आहे या आधी ऑरेंज लाइनवर असलेल्या छत्रपती चौक मेट्रो स्थानकाजवळील चौकातील पिलर वर अशीच एक सुंदर कलाकृती तयार केली आहे. या शिवाय रहाटे कॉलोनी मेट्रोस्थानकाजवळ `बेटी बचाव, बेटी पढाव’, या संकल्पनेवर आधारित कलाकृती महा मेट्रोने साकार केली आहे.

या तैल चित्राची मूळ संकल्पना महा मेट्रोचे व्यवस्थापकीय संचालक डॉ. ब्रिजेश दीक्षित यांची आहे. झाशी राणी मेट्रो स्थानकावर स्थापित केलेले हे तैलचित्र 16.5 फुट बाय 9 फुट आकारमानाचे असून याचे वजन 200 किलो आहे. झाशी राणी लक्ष्मी बाई यांच्या नावाने येथील मेट्रो स्थानक असल्याने हे चित्र येथे स्थापित होणे अतिशय उपयुक्त आहे.

1857 च्या स्वातंत्र्य लढ्यात अतिशय मोलाचे योगदान करत राणी लक्ष्मी बाई यांनी आपल्या प्राणाची आहुती दिली होती. `मी माझी झाशी देणार नाही’ हा राणीलक्ष्मी बाई यांचा त्याकाळातील निर्धार आजही सर्वांच्या स्मरणात आहे.

माईल्ड स्टील या धातूच्या सहाय्याने हे तैल चित्र तयार झाले असून २ क्रेन च्या मदतीने ते मेट्रो स्टेशनच्या पूर्वेच्या दिशेला बाह्य परिसरात स्थापित झाले आहे. हस्तांकित संस्थेच्या दीप्ती देशपांडे यांनी म्युरलचे डीझाईन केले आहे.

हे म्युरल हस्तांकित संस्थेने तयार केले असून स्थानिक कलाकार ललित आणि तनुल विकमशी तसेच अलग एंगल, मेकर्स अड्डा सारख्या संस्थांनी हे तयार करण्यात मदत केली आहे. या स्थानिक कलाकारांनी लेजर कटिंग वेल्डिंग, लायटिंग, पेटिंग तसेच तैल चित्र बसविण्याचे कार्य केले आहे.

हे तैल चित्र तयार करण्यास 1 महिन्याचा कालावधी लागला असून यामध्ये वापरण्यात आलेले संपूर्ण साहित्य जंगरोधकअसून कुठल्याही वातावरणात खराब होणार नाही. हे तैलचित्र मेट्रो स्थाकांवर स्थापित करण्याकरिता नागपूर पोलिसांच्या वाहतूक शाखेने विशेष मदत केली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here