Home Maharashtra @fadnavis_amruta । राज्याचे माजी गृहमंत्री काय हनीमुनला गेले का? सरकारवर जोरदार हल्ला

@fadnavis_amruta । राज्याचे माजी गृहमंत्री काय हनीमुनला गेले का? सरकारवर जोरदार हल्ला

604
मुंबई ब्युरो : विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस (@fadnavis_amruta) यांनी पुन्हा एकदा महाविकास आघाडी सरकारवर जोरदार हल्ला चढवलाय. माजी गृहमंत्री अनिल देशमुख, तसंच मुंबईचे माजी पोलिस आयुक्त परमबीर सिंह कुठे हनिमूनला गेले का? असा खोचक सवाल अमृता फडणवीस यांनी विचारलाय. त्याचबरोबर ड्रग्स प्रकरणात एनसीबीकडून सुरु असलेल्या कारवाईचंही त्यांनी जोरदार समर्थन केलं आहे.

केंद्रीय तपास यंत्रणांच्या चौकशीचा ससेमिरा महाविकास आघाडीतील नेते आणि मंत्र्यांवर सुरु आहे. त्यावरुन महाविकास आघाडी सरकार अस्थिर करण्यासाठी केंद्रीय तपास यंत्रणांचा वापर केला जात असल्याचा आरोप करण्यात येत आहे. याबाबत विचारलं असता, तुम्ही तशी कृती करता म्हणून आरोप होतो. तुम्ही जलयुक्त शिवार योजनेवर आरोप करता, मग तुमच्यावरही आरोप होणारच, असं प्रत्युत्तर त्यांनी महाविकास आघाडीतील नेत्यांना दिलं आहे.

त्याचबरोबर ‘सामना’तून होणाऱ्या टीकेलाही अमृता फडणवीस यांनी खोचक उत्तर दिलंय. ‘सामना’ टीका कुणावर करेल? जर त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस किंवा काँग्रेसवर टीका केली तर त्यांचं वसुली सरकार कसं चालेल? असं अमृता फडणवीस म्हणाल्या.

त्यांचं कुठे हनिमून चाललंय माहिती नाही…

‘एक पोलीस कमिश्नर असो किंवा माजी गृहमंत्री असो, त्यांचे कुठे हनिमून चाललेत आपल्याला माहीत नाही. पण हे व्हायला नको ही खरी घोष्ट आहे. तुम्हाला पण कुठे दिसले तर रिपोर्ट करा. लवकर पकडता येईल त्या लोकांना’, अशा शब्दात देशमुख आणि सिंह यांच्या गायब होण्यावरुन अमृता फडणवीस यांनी ठाकरे सरकारवर जोरदार टीका केली आहे.

ड्रग्स प्रकरणातील कारवाईचं केलं समर्थन…

त्याचबरोबर ‘इथे लोक ड्रग्ज घेऊन फिरतात. कारण कोणी दिलंय, लोकांनीच दिलंय ना. यावर काम करावं की नाही करावं, महाराष्ट्र प्रगतीच्या दृष्टीनं पुढे जावा की ड्रग्स कॅपिटल बनावा हे आपल्यालाच ठरवायचं आहे. यंग जनरेशनला तुरुंगात टाकावं हा माझा वैयक्तिक विचार नाही. त्यांना सुधारणागृहाची जास्त गरज आहे. पण त्या आधी ते कुठून येतंय, त्याचं नेटवर्क काय आहे हे कळायला पाहिजे. ते कळल्यावर त्या मुलाला तुरुंगाची नाही, तर रिहॅबिलिटेशन आणि काऊन्सिलिंगची गरज असते’, असं म्हणत अमृता फडणवीस यांनी एनसीबीच्या कारवाईचं समर्थन केलं आहे.

#Nainital | दुकान में फंसे लोगों की मुश्किल में जान, बचाने पहुंचे भारतीय सेना के जवान


  • भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नवीन माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचारसंहितेचे आम्ही पालन करतो. वाचकांना एखाद्या बातमी विषयी आपली तक्रार करायची असल्यास आमच्या वेब माध्यम तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल. प्रकाशक : (ई-मेल)- aatmnirbharkhabar@gmail.com
Previous article#Nainital | दुकान में फंसे लोगों की मुश्किल में जान, बचाने पहुंचे भारतीय सेना के जवान
Next article#Chhattisgarh | एक लाख रुपए के इनामी कमांडर सहित 43 नक्सलियों ने किया सरेंडर, 9 महिलाए भी शामिल
वाचकांनो आपन “आत्मनिर्भर खबर डॉट कॉम” ला ट्वीटर, इंस्टाग्राम आणि फेसबुक पर फॉलो करत आहात ना? अजूनपर्यंत ज्वाइन केले नसेल तर आमच्या अपडेट्स साठी आत्ताच क्लिक करा (ट्वीटर- @aatmnirbharkha1), (इंस्टाग्राम- @aatmnirbharkhabar2020), (यू ट्यूब-@aatmnirbhar khabar )(फेसबुक- @aatmnirbharkhabar2020).