नागपूर : डॉ. अर्जुन खाड़े यांच्या ‘आयुर्वेद इम्युनिटी क्लिनिक’ चे उद्घाटन वाड़ी परिसरात रविवारी (30 ऑगस्ट 2020) ला करण्यात आले. प्रमुख पाहुण्यांनी यावेळी आपले विचार व्यक्त करतांना म्हणाले की आज जेव्हा महामारी मुळे आपण त्रासलेलो आहोत, अश्या प्रसंगी आपल्याला इम्युनिटी ला वाढविण्याची नितांत आवश्यकता आहे. या प्रसंगी प्रज्ञा खाडे, संतोष खंडारे, संदीप पानसे, राधिका शेट्टे, स्मिता खंडारे, स्मिता पानसे यांची उपस्थिति होती.