Home Covid-19 College Reopening । महाराष्ट्र राज्यातील कॉलेज 20 ऑक्टोबरपासून होणार सुरु, विद्यार्थ्यांना दोन्ही...

College Reopening । महाराष्ट्र राज्यातील कॉलेज 20 ऑक्टोबरपासून होणार सुरु, विद्यार्थ्यांना दोन्ही डोस आवश्यक

438

मुंबई ब्युरो : गेल्या काही दिवसांपासून कोरोनाच्या संकटापायी बंद असलेले कॉलेज पुन्हा सुरू होणार आहेत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत कॉलेज सुरु करण्यासंदर्भात महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला. उच्च आणि तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी 20 ऑक्टोबरपासून कॉलेज सुरू होणार असल्याची माहिती दिलीय. विद्यार्थ्यांना लसीचे दोन्ही डोस आवश्यक असल्याचंही त्यांनी अधोरेखित केलंय. 20 ऑक्टोबरपासून कॉलेज सुरू होणार असल्याच्या पार्श्वभूमीवर वेगवेगळ्या जिल्ह्यात वेगवेगळी नियमावली करण्यात आलीय.

मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, बांधकाम मंत्री आणि सचिव यांची एक बैठक झाली, या बैठकीतच हा निर्णय घेण्यात आलाय. विद्यापीठ महाविद्यालय वर्ग 50% पेक्षा अधिक सुरू करण्याचे अधिकार स्थानिक प्राधिकरणाला देण्यात आलेत, अशी माहिती उच्च आणि तंत्र शिक्षणमंत्री उदय सामंत यांनी दिलीय. ते पत्रकार परिषदेत बोलत होते.

तर कॉलेजांनी कॅम्पस घेत लसीकरण करावे

कोरोनाचा प्रादुर्भाव पाहता महाविद्यालय सुरू ठेवायची का हा निर्णय सर्वस्वी स्थानिक प्राधिकरणाला असेल. दोन्ही डोस पूर्ण झाले नसतील तर महाविद्यालयांनी कॅम्पस घेत लसीकरण करावे, अशा सूचनाही देण्यात आल्यात. विशेष म्हणजे वसतिगृह सुरू करण्याचा आदेशही दिलाय. शिक्षकेतर कर्मचारी प्राध्यापक यांचं लसीकरण पूर्ण झालं पाहिजे, अशी माहिती उदय सामंत यांनी दिलीय.

‘स्थानिक प्रशासनाने निर्णय घ्यावा’

“तिसरी लाट येणार आहे की नाही ते अद्याप कुणालाच माहिती नाही. प्रत्येक जिल्ह्यात वेगवेगळ्या प्रकारची नियमावली तयार करण्याची वेळ आली तर विद्यापीठाने त्या त्या जिल्हाधिकाऱ्यांशी चर्चा करुन निर्णय घ्यावा, असे स्पष्ट मत आम्ही शासन म्हणून घेतलेला आहे. कारण काही अजूनही कोरोनाचा प्रादुर्भाव आहे. तसेच काही ठिकाणी प्रादुर्भाव वाढतोय. त्यामुळे हीच नियमावली लागू करायची की नाही याबाबत स्थानिक प्रशासनाने निर्णय घ्यावा. प्रत्येक जिल्ह्यात कदाचित वेगवेगळी नियमावली असू शकते”, असं सामंत म्हणाले.

‘त्या’ विद्यार्थ्यांची कम्पलसरी ऑनलाईन व्यवस्था

“ज्या विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष कॉलेजमध्ये उपस्थित राहणं शक्य होणार नाही त्यांची कम्पलसरी ऑनलाईन व्यवस्था महाविद्यालय किंवा विद्यापीठांनी करुन द्यायची आहे. ज्या विद्यार्थ्यांनी कोविड 19 ची लस घेतली नाही त्यांच्याकरता विद्यापीठाने संबंधित संस्थांचे प्रमुख, महाविद्यालयाचे प्राचार्य यांच्या मदतीने स्थानिक जिल्हा प्रशासनाशी समन्वय साधून विशेष लसीकरण मोहिम राबवावी, अशा सूचना आम्ही जीआरमध्ये नमूद केला आहे”, अशी माहिती त्यांनी दिली.

टप्प्याटप्प्याने वसतीगृह देखील होणार सुरु

“वसतीगृहांच्या संदर्भात देखील मोठा प्रश्न विद्यार्थ्यांसमोर उभा आहे. टप्प्याटप्प्याने वसतीगृह उघडण्याबाबतचा निर्णयही घेण्यात आला आहे. पण ही सुरु करत असताना मुंबई उच्च शिक्षण संचालक आणि पुण्याचे उच्च शिक्षण संचालकांनी यांनी पूर्ण वसतीगृहांचा आढावा घ्यायचा आहे. त्यानंतरच वसतीगृह सुरु करायचे आहेत”, अशी सूचना उदय सामंत यांनी केली. तसेच शिक्षकेत्तर कर्मचारी आणि आऊटसोअर केलेला स्टाफ जो विद्यालयात काम करतो त्यांचं शंभर टक्के लसीकरण करुन घेण्याचा प्रयत्न विद्यापीठांनी केला पाहिजे, अश्या सूचना त्यांनी केली.

एसओपी जारी | महाराष्ट्र में 22 अक्टूबर से खुल जाएंगे सिनेमा हॉल और मल्टीप्लेक्स

Previous articlePM मोदी ने लॉन्च किया ‘मेगा गतिशक्ति मास्टर प्लान’, इंडस्ट्रियल कनेक्टिविटी को मिलेगा बढ़ावा
Next articleBollywood News | दिवाली पर नए घर में शिफ्ट हो जाएंगी कृति सेनन, दिल्ली की नवरात्रि को यूं किया याद
वाचकांनो आपन “आत्मनिर्भर खबर डॉट कॉम” ला ट्वीटर, इंस्टाग्राम आणि फेसबुक पर फॉलो करत आहात ना? अजूनपर्यंत ज्वाइन केले नसेल तर आमच्या अपडेट्स साठी आत्ताच क्लिक करा (ट्वीटर- @aatmnirbharkha1), (इंस्टाग्राम- @aatmnirbharkhabar2020), (यू ट्यूब-@aatmnirbhar khabar )(फेसबुक- @aatmnirbharkhabar2020).