Home Maharashtra Devta Life Foundation | रक्तदान जनजागृती राज्यस्तरीय रॅलीला राज्यपालांनी दिल्या शुभेच्छा

Devta Life Foundation | रक्तदान जनजागृती राज्यस्तरीय रॅलीला राज्यपालांनी दिल्या शुभेच्छा

765

रक्तदानाबाबत जनजागृती करण्यासाठी राज्यातील सर्व जिल्ह्यांमध्ये फिरून रक्तदान शिबिरांचे आयोजन करणाऱ्या रक्तदान महायज्ञ रॅलीचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी राजभवन येथे स्वागत केले व रॅलीला पुढील प्रवासासाठी झेंडा दाखवून रवाना केले.


मुंबई ब्युरो : नागपूर येथिल देवता लाईफ फाउंडेशन संस्थेतर्फे आयोजित राज्यव्यापी रॅलीच्या सदस्यांनी देवता लाईव्ह फाऊंडेशनचे अध्यक्ष किशोर बावने यांच्या नेतृत्वाखाली बुधवारी (दि. ६) राज्यपालांची भेट घेऊन त्यांना रक्तदान महायज्ञ रॅलीची माहिती दिली. यावेळी संस्थेच्या विश्वस्त निलिमा बावने, सहकार भारतीचे महाराष्ट्र प्रदेशाचे महामंत्री विवेक जुगादे, संजय पेंडसे, सारिका पेंडसे, छायाचित्रकार शेखर सोनी आदी प्रामुख्याने उपस्थित होते. लेसंस्थेचे अध्यक्ष श्री किशोर बावणे यांनी या संपूर्ण रॅलीच्या पार्श्वभूमीची माहिती राज्यपालांसमोर सादर केली. संस्थेचे अध्यक्ष किशोर बावणे व संस्थेच्या विश्वस्त सौ नीलिमा बावणे यांनी मानपत्र व सन्मानचिन्ह देऊन राज्यपालांचा सत्कार केला. याप्रसंगी छायाचित्रकार शेखर सोनी यांनी लिहिलेली पुस्तके राज्यपालांना भेट दिली.

आज समाजात सेवाभावाने कार्य करणाऱ्या लोकांची कमी आहे. अनेकदा लोक प्रसिद्धीसाठी काम करतात. परंतु पद व पैसा या गोष्टी टिकणाऱ्या नाहीत. त्याउलट अंतःकरणातून मिळालेले आशिर्वाद स्थायी असतात. त्यामुळे समाजातील पीडित, दुःखी, अपंग व आजारी लोकांना देव मानून त्यांची सेवा केली पाहिजे असे राज्यपालांनी यावेळी बोलताना सांगितले.

राज्यव्यापी रॅलीमुळे राज्यभ्रमणही होईल व सोबत रक्तदानाबाबत जनजागृती निर्माण होईल असे सांगताना संस्थेने वर्षानुवर्षे काम करीत रहावे व रक्तदानाचे कार्य चिरंजीवी व्हावे या शब्दात राज्यपालांनी आपल्या शुभेच्छा दिल्या.

करोना काळात लोक रक्तदान कमी झाल्यामुळे रक्ताचा तुटवडा पडला होता. लोकांच्या मनात रक्तदानाबाबत भीती निर्माण झाली होती. रक्तदान महायज्ञाच्या माध्यमातून १२ जिल्ह्यात रक्तदान शिबिरांचे आयोजन करण्यात आले असून १५ ऑक्टोबर पर्यंत राज्यातील सर्व जिल्ह्यात रक्तदानाबाबत जनजागृती केली जाईल तसेच रक्तदान शिबिरांचे आयोजन केले जाणार असल्याची माहिती विवेक जुगादे यांनी दिली.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक देवता लाइफ फाउंडेशनचच्या उपाध्यक्ष कस्तुरी बावणे यांनी केले तर आभार प्रदर्शन देवता लाइफ फाउंडेशनचे सल्लागार विवेक जुगादे यांनी केले.

Previous articleNagpur News । लक्ष्मीस्वरूपा अनुसूया माता मंदिरात मनोकामना अखंडज्योत
Next articleMaharashtra । जिल्हा परिषद निवडणुकीतील यश कार्यकर्त्यांच्या मेहनतीचे फळ : नाना पटोले
वाचकांनो आपन “आत्मनिर्भर खबर डॉट कॉम” ला ट्वीटर, इंस्टाग्राम आणि फेसबुक पर फॉलो करत आहात ना? अजूनपर्यंत ज्वाइन केले नसेल तर आमच्या अपडेट्स साठी आत्ताच क्लिक करा (ट्वीटर- @aatmnirbharkha1), (इंस्टाग्राम- @aatmnirbharkhabar2020), (यू ट्यूब-@aatmnirbhar khabar )(फेसबुक- @aatmnirbharkhabar2020).