Home Banking अमरावती जिल्हा बँक निवडणूक । राज्यमंत्री बच्चू कडू यांनी मारली बाजी, तीन...

अमरावती जिल्हा बँक निवडणूक । राज्यमंत्री बच्चू कडू यांनी मारली बाजी, तीन मतांनी मिळविला विजय

554
अमरावती ब्युरो : अमरावती जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या (एडीसीसी) (District Central Co operative Bank) संचालक मंडळाची निवडणूक 4 ऑक्टोबर रोजी झाली. या निवडणुकीचा आज निकाल जाहीर होत आहे. या निवडणुकीत राज्यमंत्री बच्चू कडू (Bacchu Kadu) यांनी विजय मिळवला आहे. अटीतटीच्या निवडणुकीत बच्चू कडू यांनी विजय मिळवत माजी अध्यक्ष बबलू देशमुख (Babalu Deshmukh) यांचा पराभव केला आहे.

चांदुर बाजार सेवा सहकारी सोसायटीतून परिवर्तनचे राज्यमंत्री राज्यमंत्री बच्चू कडू यांनी विजय मिळवला आहे. अटीतटीच्या निवडणुकीत बच्चू कडू यांनी माजी अध्यक्ष बबलू देशमुख यांचा पराभव केला आहे. राज्यमंत्री बच्चू कडू यांना 22 मते मिळाली तर बबलू देशमुख यांना 19 मते मिळाली आणि बच्चू कडू यांनी तीन मतांनी हा विजय मिळवला आहे.

11 वर्ष बँकेवर बबलू देशमुख गटाचे वर्चस्व

गत 11 वर्षांनंतर जिल्हा मध्यवर्ती बँकेची निवडणूक होऊ घातली आहे. या अकरा वर्षात राजकीय घडामोडीत अनेक बदल झाल्याने सहकार क्षेत्रामधील प्रतिष्ठेची समजल्या जाणाऱ्या या निवडणुकीत यावेळी एका गटात महिला व बालकल्याण मंत्री व पालकमंत्री यशोमती ठाकूर (Yashomati Thakur) तर दुसऱ्या गटात राज्यमंत्री बच्चू कडू यांचा समावेश आहे. याशिवाय अनेक दिग्गज निवडणुकीच्या मैदानात उतरल्याने या निवडणुकीत आणखीच रंगत वाढली होती.

जिल्हा मध्यवर्ती बँकेची यापूर्वीची निवडणूक सन 2010 मध्ये झाली होती. त्यावेळी बबलू देशमुख व संजय खोडके असे दोन गट निवडणूक मैदानात होते. त्यावेळी बबलू देशमुख गटाच्या 25 पैकी 13 जागा निवडून आल्याने बँकेवर त्यांनी सत्ता प्रस्तापित केली. सन 2015 मध्ये पंचवार्षीक निवडणूक होणे अपेक्षित होते. परंतु राजकीय व्देष व अन्य कारणांमुळे तब्बल पाच वर्ष बँकेतील विविध प्रकरण न्यायप्रविष्ट झाल्याने सन 2010 पासून निवडणूकच झाली नाही. त्यामुळे तब्बल 11 वर्ष बँकेवर जिल्हा परिषदेचे अध्यक्ष बबलू देशमुख गटाचे वर्चस्व होते. त्यामुळे विरोधकांची चांगलीच गोची झाल्याने यावेळी पुन्हा सर्वच विरोधक एकत्र आले.

विजयानंतर बच्चू कडूंची पहिली प्रतिक्रिया

या विजयानंतर बच्चू कडू यांनी आपली पहिली प्रतिक्रिया दिली आहे. पहिल्यांदाच सहकार निवडणूक लढवली आणि विजयी झालो. राजकारणात कधीही गणितं बिघडू शकतात. गणित हे भागाकार, गुणाकार, वजाबाकी होऊ शकते. त्यामुळे अध्यक्ष कोण होईल हे प्रश्नचिन्ह आहे. माझ्याकडं मतं कमी होते तरी मी विजयी झालो. याचा महाविकास आघाडीवर कुठलाही फरक पडणार नाही, असं बच्चू कडू म्हणाले.

बच्चू कडू समर्थकांचा जल्लोष

अमरावती जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची काल निवडणूक पार पडली, यात परिवर्तन व सहकार पॅनल होते यात राज्यमंत्री बच्चू कडू हे सुद्धा परिवर्तन पॅनल कडून निवडणूक रिंगणात होते आज मतमोजणी पार पडली यात राज्यमंत्री बच्चू कडू यांनी बँकेचे माजी अध्यक्ष व काँग्रेस जिल्हाध्यक्ष बबलु उर्फ अनिरुद्ध देशमुख यांचा पराभव करत बच्चू कडू यांनी दोन मतांनी विजय मिळवला यात बच्चू कडू विजयी होताच समर्थकांनी जल्लोष करत आनंद व्यक्त केला

सहकार पॅनलचे विजयी उमेदवार
  1. विरेंद्र जगताप – चांदूर रेल्वे
  2. श्रीकांत गावंडे – धामणगाव
  3. सुरेश साबळे – तिवसा
  4. सुधाकर भारसाकडे – दर्यापूर
  5. हरिभाऊ मोहोड – भातुकली
  6. सुनील वऱ्हाडे – अमरावती
  7. दयाराम काळे- चिखलदरा
  8. प्रकाश काळबांडे – सहकारी पतसंस्था
परिवर्तन पॅनलचे विजयी उमेदवार
  1. बच्चू कडू – चांदूरबाजार
  2. चित्रा डहाने – मोर्शी
  3. अजय मेहकरे – अंजनगाव सूर्जी
  4. जयप्रकाश पटेल – धारणी
अपक्ष विजयी उमेदवार
  1. अभिजित ढेपे – नांदगाव खंडेश्वर
  2. नंरेशचंद्र ठाकरे – वरुड
  3. आनंद काळे – अचलपूर
Previous articleDevta Life Foundation | नासिक पहुंचा रक्तदान महायज्ञ, केंद्रीय स्वास्थ्य राज्य मंत्री भारती पवार से की मुलाकात
Next articleLakhimpur | कांग्रेस और आप पार्टी ने ‘हादसे का वीडियो’ शेयर कर कहा- यह तो हत्या है
वाचकांनो आपन “आत्मनिर्भर खबर डॉट कॉम” ला ट्वीटर, इंस्टाग्राम आणि फेसबुक पर फॉलो करत आहात ना? अजूनपर्यंत ज्वाइन केले नसेल तर आमच्या अपडेट्स साठी आत्ताच क्लिक करा (ट्वीटर- @aatmnirbharkha1), (इंस्टाग्राम- @aatmnirbharkhabar2020), (यू ट्यूब-@aatmnirbhar khabar )(फेसबुक- @aatmnirbharkhabar2020).