Home Sports IND W vs AUS W । चौकारांची बरसात करत स्मृती मानधनाने फटकावलं...

IND W vs AUS W । चौकारांची बरसात करत स्मृती मानधनाने फटकावलं पहिलं कसोटी शतक, विराट कोहलीशी बरोबरी

570

मुंबई ब्युरो : भारताची स्टार क्रिकेटपटू स्मृती मानधना हिने गोल्ड कॉस्टवर खेळवल्या जात असलेल्या डे-नाईट कसोटी सामन्यात ऑस्ट्रेलियाविरुद्ध ऐतिहासिक शतक झळकावले आहे. भारतीय महिला संघ प्रथमच डे-नाईट कसोटी सामना खेळत आहे आणि मानधनाने तिच्या शतकासह हा सामना संस्मरणीय बनवला आहे. मानधनाच्या कारकिर्दीतील हे पहिले कसोटी शतक आहे. तिने सामन्याच्या दुसऱ्या दिवशी आपले शतक पूर्ण केले. स्मृती मानधनाच्या कारकिर्दीतील हा चौथा कसोटी सामना होता. या सामन्यात तिने शानदार शतक झळकावले. यापूर्वी, कसोटीत तिची सर्वोत्तम धावसंख्या 78 होती, जी तिने या वर्षी इंग्लंडविरुद्ध केली होती.

आपल्या कारकिर्दीतील चौथा कसोटी सामना खेळताना मानधनाने 170 चेंडूत 100 धावांचा टप्पा गाठला. या शतकी खेळीत तिने 18 चौकारही लगावले. सामन्याच्या दुसऱ्या दिवशी, भारतीय डावातील 51.5 षटकात, तिने एलिस पेरीच्या चेंडूवर मिडविकेटवर चौकार मारून आपले ऐतिहासिक शतक पूर्ण केले. सलामीवीर म्हणून शतक झळकावणारी ती पहिली भारतीय महिला कसोटी खेळाडू ठरली आहे.

दुसऱ्या दिवशी मोठं जीवदान

सामन्याच्या पहिल्याच चेंडूपासून मानधना आत्मविश्वासाने परिपूर्ण दिसली. पहिल्या दिवसाच्या पहिल्या सत्रात तिने ऑस्ट्रेलियन गोलंदाजांची धुलाई सुरु ठेवली. शेफाली वर्मासोबत पहिल्या विकेटसाठी तिने 93 धावांची भागीदारी करताना चौकारांचा वर्षाव केला. तिने केवळ 51 चेंडूत आपले अर्धशतक पूर्ण केले होते. चाहते तिच्या शतकाची वाट पाहात होते पण पावसामुळे ही प्रतीक्षा खूपच वाढली. मानधानालाही सामन्याच्या दुसऱ्या दिवशी मोठं जीवदान मिळालं. दुसऱ्या दिवसाच्या दुसऱ्या षटकात ती पेरीच्या चेंडूवर झेलबाद झाली. मात्र, गोलंदाज पेरीचा पाय रेषेच्या पुढे असल्याने पंचांनी नो बॉल दिला.

Previous articleSchool Reopen | नागपुर में कड़ी शर्तों के साथ 4 अक्टूबर से खुलेंगे स्कूल, आदेश जारी
Next articleGandhi Jayanti | लुक में अब चार चांद लगाएगी बापू की स्टाइलिश खादी, फैशन के ट्रेंड को देखते हुए खादी भी बदली
वाचकांनो आपन “आत्मनिर्भर खबर डॉट कॉम” ला ट्वीटर, इंस्टाग्राम आणि फेसबुक पर फॉलो करत आहात ना? अजूनपर्यंत ज्वाइन केले नसेल तर आमच्या अपडेट्स साठी आत्ताच क्लिक करा (ट्वीटर- @aatmnirbharkha1), (इंस्टाग्राम- @aatmnirbharkhabar2020), (यू ट्यूब-@aatmnirbhar khabar )(फेसबुक- @aatmnirbharkhabar2020).