मुंबई ब्यूरो : महाराष्ट्र राज्य शासनाने पोलीस दलात लवकरच पोलीस शिपाई संवर्गातील 12528 पदांसाठी भरती करण्याचा ऐतिहासिक निर्णय घेतला आहे. राज्य शासनाच्या या निर्णयाबद्दल खुद्द राज्याचे गृह मंत्री अनिल देशमुख यांनी ट्वीट करुन
माहिती दिली आहे.
राज्य शासनाने पोलीस दलात' पोलीस शिपाई' संवर्गातील १२५२८ पदांसाठी पोलीस भरती करण्याचा ऐतिहासिक निर्णय घेतला आहे. ही भरती सर्व समाजाला न्याय देणारी असेल. लवकरच भरतीची प्रक्रिया सूरू होईल. सर्व परीक्षार्थींना तयारीसाठी शुभेच्छा!
— ANIL DESHMUKH (@AnilDeshmukhNCP) September 17, 2020
गुह मंत्री अनिल देशमुख यांनी म्हटले आहे की, “पोलीस शिपाई संवर्गातील 12528 पदांसाठी होणारी ही भरती सर्व समाजाला न्याय देणारी असेल. लवकरच भरतीची प्रक्रिया सूरू होईल. सर्व परीक्षार्थींना तयारीसाठी शुभेच्छा!” राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत पोलीस भरती संदर्भात महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे. राज्यात साडे बारा हजार पदांसाठी पोलीस भरती होणार आहे. पहिल्यांदाच इतक्या मोठ्या प्रमाणात पोलीस भरती होणार आहे. पोलीस भरतीची प्रक्रिया लवकर सुरू करण्यात येईल, अशी माहिती गृहमंत्री अनिल देशमुख यांनी बैठकीनंतर दिली आहे.
In a historic decision, Hon’ble CM Uddhav Thackeray Ji (@CMOMaharashtra)& Dy. CM Ajit Pawar Ji (@AjitPawarSpeaks), have approved the mass recruitment of 12,538 'Police Shipai' post. I would like to thank them for this & would also like to wish the candidates for the preparations. pic.twitter.com/CyAAgbr7fP
— ANIL DESHMUKH (@AnilDeshmukhNCP) September 16, 2020
भरतीत मराठा समाजाला न्याय देणार : गृहमंत्री
मराठा समाजाचे आरक्षण टिकवण्यासाठी राज्य सरकार प्रयत्न करत आहे. दरम्यान राज्यात पोलीस विभागातील 12 हजार 528 रिक्त जागा भरण्यात येणार आहे. पण, ही भरती करताना मराठा समाजासाठी 13% जागा बाजूला काढून ही बाब कायद्यानुसार तपासून मराठा समाजाला न्याय देणार असल्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी स्पष्ट केलं आहे. आमदार विनायक मेटे यांनी पोलीस मेगा भरतीत मराठा समाजाच्या 13% जागा रिक्त ठेवण्याची मागणी केली होती. या पार्श्वभूमीवर गृहमंत्र्यांनी भूमिका स्पष्ट केली आहे.
——————
ये भी पढ़ें-
पीएम मोदी का जन्मदिन आज : राष्ट्रपति कोविंद, राहुल गांधी सहित अनेकों ने की दीर्घायु की कामना
नागपुर में अब अगले चार शनिवार, रविवार जनता कर्फ्यू
नागपुर के सीताबर्डी में अतिक्रमण पर चली जेसीबी, हुआ सफाया




















