Home मराठी #PUNE | पुण्यात रंगणार आनंदयात्री प्रिमियर लीगचे सामने, विदर्भ वीर्स उतरणार मैदानात

#PUNE | पुण्यात रंगणार आनंदयात्री प्रिमियर लीगचे सामने, विदर्भ वीर्स उतरणार मैदानात

679

नागपूर ब्यूरो : फेसबुक आणि इतर समाज माध्यम विश्वातील अगदी पहिला असा एक आगळावेगळा भव्य उपक्रम म्हणजे ‘एवायपीएल’. उच्च विद्या विभुषीत राम चिंचलीकर आणि शुभदा ताकभाते संचालित आनंदयात्री या फेसबुक समुहातर्फे जिल्हास्तरीय क्रिकेट स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे. दि. २० आणि २१ नोव्हेंबर २०२१ रोजी गेम आॕन स्पोर्ट्स क्लब, कर्वेनगर, पुणे येथे या भव्य स्पर्धा होतील. एलिगंट रिअॕलिटी डेव्हलपर प्रायवेट लिमिटेड आणि राजेश व्यास गृप, पुणे प्रायोजित अशा या स्पर्धेत सहभागी होण्यासाठी पुण्या व्यतीरिक्त मुंबई, ठाणे, कोल्हापूर, सोलापूर, मराठवाडा तसेच विदर्भ असे एकूण १६ संघ उपस्थित राहणार आहेत. सोशल मिडियाद्वारे एकत्र आलेल्या समूहातील पुरुष आणि महिला मिश्र सांघिक स्पर्धा होणारा असा हा पहिलाच भव्य आणि विशेष सोहळा असल्याचे समूहाचे संचालक राम चिंचलीकर यांनी नमूद केले.
विविध क्षेत्रातील मान्यवर तसेच अनेक सेलिब्रिटीज ही या ठिकाणी सदिच्छा भेट देणार आहेत. २१ नोव्हेंबर ला पुण्याचे प्रथम नागरीक महापौर मुरलीधर मोहोळ आणि भाजप युवा मोर्चा राज्य सरचिटणीस नगरसेवक सुशील मेंगडे यांच्या शुभहस्ते बक्षिस वितरणाचा कार्यक्रम संपन्न होणार आहे. असेही चिंचलीकर यांनी सांगितले. ‘आनंदयात्री फेसबुक समुहाचा हा पुढाकार आणि उपक्रम अतिशय आवडला म्हणूनच प्रायोजक म्हणूनही आम्ही यामधे सामिल झालो आहोत. या सोहळ्या बाबत आम्ही खूपच उत्सुक आहोत.’ असे राजेश व्यास गृप, पुणे च्या डायरेक्टर वैशाली व्यास यांनी सांगितले.
या कोव्हिड काळात एकंदरीत बदललेल्या जीवनशैलीने सगळ्यांनाच मनस्ताप होत होता. अशा वेळेस खुंटलेला संवाद नव्याने सुरू व्हावा, प्रत्येकाला व्यक्त होता यावं आणि स्वतःतील सुप्त गुणांना वाव देता यावा या उद्देशाने या समूहाची निर्मिती केली. आणि अगदी मोजक्या काळात गृहिणी, शिक्षक, वकील, कायदेतज्ञ, वैद्यकिय क्षेत्रातील तज्ञ, पोलिस क्षेत्रातील मान्यवर तसेच सिनेजगतातील नावाजलेली व्यक्तीमत्वे समूहात जोडली गेली आणि आज केवळ एक फेसबुक समूह न रहाता आनंदयात्री हे ३५०० हून अधिक सभासदांचे एक परिपूर्ण कुटुंब म्हणून वाढत आहे याचा मनस्वी आनंद आहे असे संचालिका शुभदा ताकभाते यांनी सांगितले.

गाण्याचे कार्यक्रम, सिने विश्वातील मान्यवरांच्या मुलाखती असे मनोरंजक, आरोग्य विषयक माहितीसत्र असे आॕनलाईन उपक्रम समूहात राबवले गेले. कोव्हिड नियमांचे पालन करत जिल्हा स्तरीय स्नेह मेळावे आयोजित केले गेले. सामाजिक बांधिलकी जपत आनंदयात्री समूहा तर्फे मोफत लसीकरण उपक्रम ही पार पाडण्यात आले. आता एवायपीएल हा जिल्हा स्तरीय क्रिकेट स्पर्धा हा अतिशय महत्त्वाचा आणि ऐतिहासिक उपक्रम पुण्यात संपन्न होत आहे. सामाजिक किंवा आर्थिक स्तर बाजूला ठेवून परस्परातील सामंजस्य आणि मैत्र वृद्धिंगत व्हावे हाच यामागील मुख्य उद्देश असल्याचे आनंदयात्रीचे संचालक राम चिंचलीकर आणि शुभदा ताकभाते यांनी सांगितले. आयोजक राम चिंचलीकर, शुभदा कुलकर्णी ताकभाते, परेश लिमये, अश्विनीकुमार हळदणकरप्, प्रशांत पोरे, अस्मिता महिंद्रकर, राजन गुणे, विद्या जोशी तांडेल आहेत.

 

आनंदयात्री AYPL विदर्भ वीर्स🏏

1. अभिजीत धामोडे पाटिल (कॅप्टन)
2. स्वाती दिवेकर
3. अस्मिता महिंद्रकर
4. प्रतिभा वाळके
5. जयंत दलाल
6. प्रशांत काळे(उप कॅप्टन)
7. अभिजीत गुडधे
8. प्रकाश वाघमारे
9. किशोर वार्षे
10. प्रशांत ढोलके
11. तेजस भातकुलकर

तीनों कृषि कानून वापस | सिंघु बॉर्डर पर जश्न, किसान बोले- साथ बैठकर आगे की रणनीति तय करेंगे

Previous articleतीनों कृषि कानून वापस | सिंघु बॉर्डर पर जश्न, किसान बोले- साथ बैठकर आगे की रणनीति तय करेंगे
Next article#cricket | सीरीज जीतने के इरादे से उतरेगी टीम इंडिया, कीवी टीम के लिए ‘करो या मरो’ की जंग
वाचकांनो आपन “आत्मनिर्भर खबर डॉट कॉम” ला ट्वीटर, इंस्टाग्राम आणि फेसबुक पर फॉलो करत आहात ना? अजूनपर्यंत ज्वाइन केले नसेल तर आमच्या अपडेट्स साठी आत्ताच क्लिक करा (ट्वीटर- @aatmnirbharkha1), (इंस्टाग्राम- @aatmnirbharkhabar2020), (यू ट्यूब-@aatmnirbhar khabar )(फेसबुक- @aatmnirbharkhabar2020).