Home मराठी Nagpur । अनिल देशमुखांवरील कारवाई विरोधात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आंदोलन

Nagpur । अनिल देशमुखांवरील कारवाई विरोधात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आंदोलन

नागपूर ब्युरो : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने महाराष्ट्र राज्याचे माजी गृहमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते अनिल देशमुख यांच्यावर केंद्र सरकारने केलेल्या हेतूपुरस्सर जाणीवपूर्वक व अनुचित कारवाई च्या विरोधात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने भव्य नारे निदर्शने व भव्य आंदोलन करण्यात आले. केंद्र सरकारच्या विरोधात भव्य घोषणl देण्यात आल्या व इडी व सीबीआय च्या भाजप धोरणावर टीका करण्यात आली.

काही वेळात सीताबर्डी पोलिस स्टेशन चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सबनीस हे घटनास्थळी पोहोचले. त्यांनी पोलीस कारवाई केली व व डीटेन करून सर्व कार्यकर्त्यांची सुटका केली. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे माजी आमदार प्रकाश गजभिये व नागपूर शहर अध्यक्ष नगरसेवक दूनेश्र्वर पेठे, प्रशांत पवार, शैलेंद्र तिवारी, रवी पराते,राजेश माटे, रिजवान अन्सारी, नूतन रेवतकर, आशिष आवळे, वर्षा शामकुळे, रवी पांडे, अरुण अडिकाने, द्विवेदी, मानापुरे, श्रीवास्तव,अनिल बोकडे, प्रणय जांभूळकर, राहुल पांडे, अमोल पल्लीवार, दिनकर वानखेडे आदी उपस्थित होते.