Home मराठी Gadchiroli । शेतकऱ्यांचे वीज कनेक्शन पूर्ववत जोडण्यासाठी राष्ट्रवादी महिला काँग्रेस पार्टी सरसावली

Gadchiroli । शेतकऱ्यांचे वीज कनेक्शन पूर्ववत जोडण्यासाठी राष्ट्रवादी महिला काँग्रेस पार्टी सरसावली

जिल्हाध्यक्ष शाहीन जमीर हकीम यांच्या नेतृत्वात राज्य विद्युत वितरण कंपनी च्या कार्यकारी अभियंत्याला दिले निवेदन

तात्काळ बिल भरण्यास मुदतवाढ देण्यात येऊन एजी पंपाचा विद्युत पुरवठा नियमित पणे चालू करण्याची मागणी


गडचिरोली ब्युरो : गडचिरोली जिल्ह्याच्या मुलचेरा तालुक्यातील मौजा लभानतांडा या ठिकाणी शेतकऱ्यांच्या शेतात मागील पाच वर्षापासून लावण्यात आलेले एजी पंपाचे केबल काढून विद्युत पुरवठा बंद करण्यात आला आहे. याप्रकरणी गडचिरोली जिल्हा राष्ट्रवादी महिला काँग्रेस पार्टी च्या पदाधिकाऱ्यांनी जिल्हाध्यक्ष शाहीन जमीर हकीम यांच्या नेतृत्वात राज्य विद्युत वितरण कंपनी आलापल्ली येथील कार्यकारी अभियंत्याला बुधवार दिनांक 23 जुन ला निवेदन दिले.


राष्ट्रवादी महिला काँग्रेस पार्टी च्या जिल्हाध्यक्ष शाहीन जमीर हकीम यांनी या निवेदनात म्हटले आहे की या परिसरातील शेतकऱ्यांना नियमितपणे विजेचे बिल देण्यात येत नव्हते त्यामुळे शेतकऱ्यांनी नियमितपणे विद्युत बिलाची रक्कम भरणा केलेली नाही. त्यातच कोविड महामारी मुळे मागील दोन वर्षापासून सुद्धा शेतकऱ्यांना नियमीतपणे बिल देण्यात आलेले नाही. अशा परिस्थितीमध्ये वीज वितरण कार्यालयाकडून कोणत्याच प्रकारची पूर्वसूचना न करता अचानक पणे एजी पंपांच्या डीपी वरून केबल काढून विद्युत पुरवठा खंडित करण्यात आलेला आहे. सध्या कास्तकारी चे दिवस समोर असल्याने शेतकऱ्यांचे शेतात काम सुरू आहेत. अशावेळी एजी पंप बंद केल्याने पाण्याची अडचण निर्माण होऊन रोवणी चे कार्य प्रभावित होऊ शकते.

या निवेदनाच्या माध्यमातून कार्यकारी अभियंता यास सांगण्यात आले की वीज वितरण कंपनीकडून जे अवास्तव बिल शेतकऱ्यांना देण्यात आलेले आहेत ते भरण्यास सध्या शेतकरी असमर्थ आहेत, मात्र जास्तीत जास्त शेतकरी सध्या पाच हजार रुपये भरणा करण्यास तयार आहेत. उर्वरित रक्कम शेतकरी सुलभ हप्त्या प्रमाणे भरणा करण्यास तयार असून त्यांना थोडी मुदतवाढ देण्यात येऊन एजी पंपाचे विद्युत पुरवठा नियमित पणे चालू करण्याची यावेळी मागणी करण्यात आली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here