Home Health Nagpur | मेयोमध्ये आम्ही भारतीयच्या सुपर हिरोंचा सत्कार

Nagpur | मेयोमध्ये आम्ही भारतीयच्या सुपर हिरोंचा सत्कार

नागपूर ब्यूरो: इंदिरा गांधी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय नागपूर येथे जागतिक रक्तदाता दिनानिमित्त जिल्हयातील रक्तदान शिबीर आयोजक व अधिकाधिक वेळा रक्तदान करणारे नियमित रक्तदातायांचा सत्कार करण्यात आला.
याप्रसंगी रक्तपेढी प्रमुख डॉ. प्रदीप बुटले यांनी बोलताना, “शासकीय रुग्णालयातील गोरगरीब रुग्णांना मोफत रक्तपुरवठा करण्याच्या निःस्वार्थ हेतूने नियमित रक्तदान करणारे रक्तदाताहे भारतीय समाजातील रियल हिरो आहेत तर ऐच्छिक रक्तदान शिबीर आयोजित करणारे आयोजक हे सुपर हिरो आहेत” असे मत व्यक्त केले.
याप्रसंगी आकाशझेप फाऊंडेशन रामटेक द्वारा संचालित आम्ही भारतीय अभियान अंतर्गत कार्यान्वित शिबीर आयोजक साक्षोधन कडबे रामटेक (मुख्य संयोजक आम्ही भारतीय अभियान), प्रा. अरविंद दूनेदार (अध्यक्ष आकाशझेप फाऊंडेशन, रामटेक), डॉ. इरफान अहमद शेख पारशिवनी (मुख्य संयोजक, मानव एकता मंच), वैभवराव तुरक, रामटेक (जिल्हाध्यक्ष, मनाम एकता मंच नागपूर), प्रितम मेश्राम नागपूर (सचिव, करुणा फाउंडेशन), भूषण सवाईकर मोहपा (मनाम एकता मंच, कळमेश्वर तालुका), अभय चकबैस (गुरूदेव सेवा मंडळ पालासावळी ता. पारशिवनी), शैलेश वाढई रामटेक (जिल्हा संघटक, ग्राम पंचायत कर्मचारी युनियन, नागपूर), प्रदिप भालेराव (हेल्पिंग हॅण्ड बहुद्देशीय सामाजिक संस्था नागपूर), नियमित रक्तदाता गोविंद ठवरे, साहोली खापरखेडा ( 32 वेळा रक्तदान), इमरान हमिद बाघाडे, पारशिवनी (40 वेळा रक्तदान), चेतन शंकरराव देशमुख, पारशिवनी (41 वेळा रक्तदान) यांना सन्मानपत्र व स्मृतिचिन्ह प्रदान करून गौरविण्यात आले. यावेळी डॉ. बळवंत कोवे (विभाग प्रमुख, विकृती शास्त्र), वरिष्ठ प्राध्यापक, डॉ.नितीन शेंडे (वरिष्ठ अधिक्षक), डॉ. पांडे, डॉ. सागर गवई, डॉ. वसीम खान, चेतन मेश्राम, वंदना भगत व रक्तपेढी अधिकारी आणि कर्मचारी प्रामुख्याने उपस्थित होते. शासकीय रक्तपेढी सोबत निःस्वार्थ वृत्तीने कार्य करणाऱ्या शिबीर आयोजकांच्या वतीने साक्षोधन कडबे यांनी आयजीजीएमसी रक्तपेढी अधिकारी व कर्मचारी यांचे आभार व्यक्त केले.