Home मराठी Appointment | भाजपा अनुसूचित जाती मोर्चाचे नागपूर शहर संपर्क प्रमुख पदी राम...

Appointment | भाजपा अनुसूचित जाती मोर्चाचे नागपूर शहर संपर्क प्रमुख पदी राम अहिरवार

नागपूर ब्यूरो: भाजपा प्रभाग क्र. 35 चे महामंत्री राम अहिरवार आणि भाजपा दक्षिण पश्चिम विधानसभा अनुसूचित जाती मोर्चाचे संपर्क प्रमुख यांची भाजपा अनुसूचित जाती मोर्चाचे नागपूर शहर संपर्क प्रमुख पदावर नियुक्ती करण्यात आली आहे.

त्यांचे सामाजिक कार्य आणि सक्रियता पाहून भाजपा शहराध्यक्ष आमदार प्रवीण दटके यांनी त्यांच्यावर ही जबाबदारी सोपविली आहे. राम अहिरवार यांनी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, भाजपा शहर अध्यक्ष प्रवीण दटके, माजी महापौर संदीप जोशी, मोर्चाचे अध्यक्ष राजेश हाथीबेडे आणि आघाडीचे प्रदेश सचिव सतीश सिरसवान यांचे आभार व्यक्त केले.