Home Positive Nagpur | लॉकडाऊन ने दिला चळवळीला जन्म

Nagpur | लॉकडाऊन ने दिला चळवळीला जन्म

क्रांतीकारी आवाज संघटनेची राज्य कार्यकारिणी जाहीर

नीता सोनवणे यांची राज्याच्या उपाध्यक्ष पदी निवड

नागपूर ब्यूरो: कोरोनाच्या संकटात देशात, राज्यात अनेक उलाथापालथ झाल्या. अनेक प्रश्न नागरिकांच्या समोर उभे राहिले आहेत. मात्र या प्रश्नाकडे शासनाचे दुर्लक्ष होतं असलेल्याने राज्यातील अनेक ठिकाणचे कार्यकर्त्यांनी एकत्र येऊन सामाजिक लढा द्यायला सुरवात केली आहे. यामध्ये शाळेची फी माफी, कर्ज वसुली, लाईटबील शेतकऱ्यांचे प्रश्न अशा अनेक विषयांनावर एकत्र येऊन कामं सुरु केल्यानंतर या समूहाने क्रांतीकारी आवाज या संघटनेची स्थापना केली आहे. अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर या संघटनेची कार्यकारिणी कार्यरत झाली आहे.

याबाबत सविस्तर माहिती अशी की क्रांतीकारी आवाज या संघटनेच्या स्थापन झाल्यानंतर या संघटनेची पाहिली कार्यकारिनी घोषित करण्यात आली असून या मध्ये संस्थापक व कार्याध्यक्ष मच्छिन्द्र टिंगरे बारामती, रवींद्र टकले अध्यक्ष बारामती, भक्ती जाधव उपाध्यक्ष सोलापूर, नीता सोनवणे उपाध्यक्ष नागपूर, भारत मते उपाध्यक्ष मुबंई, मयूर सोळसकर सचिव दौंड, सागर शिंदे सहकार्यवाहक सोलापूर, स्वप्नील हवालदार प्रदेश सरचिटणीस शिराळा, वीरभद्र कावडे सदस्य सातारा, हनुमंत वीर सदस्य इंदापूर, शितल मोठे करमाळा,राज्यसंघटक मनोज पवार बारामती,सागर पोमन यांची सदस्य आणि प्रदेश युवक अध्यक्ष म्हणून नेमणूक करण्यात आली आहे.संघटनेच्या प्रवक्ता म्हणून डॉ. गणेश शिंदे पुणे यांची निवड झाली आहे. ही सर्व करिकारिणी संघटनेचे ध्येय आणि उ्दिष्टे महाराष्ट्रातील तळागाळातील पोहचवणार असल्याची माहिती राज्याच्या उपाध्यक्ष नीता सोनावणे यांनी दिली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here