Home मराठी Nagpur | मोहगाव झिलपी तलावात बुडून बापलेकाचा मृत्यू

Nagpur | मोहगाव झिलपी तलावात बुडून बापलेकाचा मृत्यू

नागपूर ब्यूरो: तालुक्यातील मोहगाव झिलपी तलावावर मुलाच्या वाढदिवस साजरा करण्यासाठी आलेल्या कुटुंबातील बापलेकाचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. ही घटना आज दुपारी बारा वाजता घडली. हिंगणा पोलिसांनी स्थानिकांच्या मदतीने दुपारी दोन वाजता दोन्हीही मृतदेह बाहेर काढले. अब्दुल आफिक अब्दुल गनी शेख (वय 35 वर्षे) वडील तर मुलगा अब्दुल शहबील अब्दुल असिफ शेख (वय 12 वर्षे) अशी मृतकांची नावे आहेत.

नागपूर येथील संघर्ष नगर, टिपू सुलतान चौकात राहणाऱ्या अब्दुल च्या लहान मुलांचा आज वाढदिवस होता त्यामुळे वाढदिवस साजरा करण्यासाठी अब्दुल त्याची पत्नी आसमा व दोन्ही मुलांना घेऊन मोहगाव झिलपी तलाव परिसरात आले. काही वेळ घालविल्यानंतर अब्दुल व मोठा मुलगा शहबील हे आंघोळ करण्यासाठी तलावात उतरले. त्यानंतर पत्नी आसमा सुद्धा कमी पाण्यात लहान मुलाला आंघोळ करून देत होती. इतक्यात खोल पाण्यात गेलेला अब्दुल व त्याचा मोठा मुलगा पाण्यात बुडायला लागला. आसमा सुद्धा ओरडत त्यांना वाचविण्यासाठी जात होती त्याचवेळी गावातील काही शेतकरी या भागातून जात होते .ते मदतीला धावले व त्यांनी आसमा व लहान मुलाला पाण्याबाहेर काढले. मात्र बापलेकाना वाचविण्यात त्यांना यश आले नाही. येथील सरपंच प्रमोद डाखळे सुद्धा घटनास्थळी आले त्यानंतर तात्काळ याची माहिती हिंगणा पोलिसांना देण्यात आली.

वरिष्ठ पोलीस निरीक्षक सरीन दुर्गे , पोलीस निरीक्षक सपना क्षीरसागर यांनी घटनास्थळी धाव घेतली व दुपारी दोन वाजता मोहंगावातील पट्टीच्या पोहणाऱ्या तरुणांच्या मदतीने दोन्ही मृतदेह तलावाच्या बाहेर काढून उत्तरीय तपासणीसाठी हिंगणा येथील ग्रामीण रुग्णालयात हलविण्यात आले. हिंगणा पोलिसांनी आकस्मिक मृत्यू चा गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरू आहे

Previous articleAkola | धर्म जातीच्या भिंती तोडून माणूसकी जपणारे जावेद जकारिया
Next articleNagpur | नागपुर पुलिस ने एकसाथ मारे 86 छापे, ₹20 लाख से ज्यादा की ड्रग्स जब्त
वाचकांनो आपन “आत्मनिर्भर खबर डॉट कॉम” ला ट्वीटर, इंस्टाग्राम आणि फेसबुक पर फॉलो करत आहात ना? अजूनपर्यंत ज्वाइन केले नसेल तर आमच्या अपडेट्स साठी आत्ताच क्लिक करा (ट्वीटर- @aatmnirbharkha1), (इंस्टाग्राम- @aatmnirbharkhabar2020), (यू ट्यूब-@aatmnirbhar khabar )(फेसबुक- @aatmnirbharkhabar2020).